प्रेमविवाहानंतर तरुणीला स्वीकारण्यास नकार; केला जातीवरून पाणउतारा; तरुणाविरोधात ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा

या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.
प्रेमविवाहानंतर तरुणीला स्वीकारण्यास 
नकार; केला जातीवरून पाणउतारा;  तरुणाविरोधात ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा

नवी मुंबई : रबाळे येथील गोठीवली गावात राहणाऱ्या एका तरुणाने अनुसुचित जातीतील तरुणीसोबत प्रेम विवाह केल्यानंतर तिला आपल्या घरी घेऊन न जाता, उलट तिचा जातीवरून पाणउतारा करून तीचा स्विकार करण्यास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पीडित तरुणीने वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांनी पीडित तरुणीची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात ॲट्रोसीटीनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील ३० वर्षीय पीडित तरुणी ही अनुसुचित जातीतील असून, २०१५ मध्ये या तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून गोठीवली गावातील प्रणय याच्यासोबत मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर या दोघांनी २०१९ मध्ये बांद्रा येथे जाऊन हिंदु वैदिक पद्धतीने लग्न केले; मात्र त्यावेळी प्रयणने त्याच्या बहिणीचे लग्न बाकी असल्याचे तिचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची माहिती त्याच्या घरच्यांना देण्याचे आश्वासन देऊन तिला आपल्या घरी न नेता तिच्याच घरी राहण्यास सांगितले. २०२२ मध्ये प्रणयच्या बहीणीचे लग्न झाल्यानंतर पीडित तरुणीने सासरी घेऊन जाण्यास प्रयणच्या पाठीमागे तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रणयने पीडित तरुणीला ती खालच्या जातीची असल्यामुळे तिला घरी नेल्यास त्याच्या कुटुंबाला समाजामधून काढुन टाकतील असे बोलून त्यांच्यातील संबध संपवण्यास सांगतिले. तसेच पीडित तरुणीला घरात आणल्यास जीव देण्याची धमकी प्रणयच्या आईने दिली. अशाप्रकारे प्रणयच्या घरच्यांनी सर्वानुमते पीडित तरुणीला त्यांच्या घरी ठेवण्यास नकार कळविला. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या पोलिसांनी पीडित तरुणीला महिला दक्षता कमिटीकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार पीडित तरुणीने महिला दक्षता कमिटीकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली.

logo
marathi.freepressjournal.in