ट्रेलरची स्कूटीला धडक; दोन महिला रुग्णालयात दाखल

सदर जखमी महिलांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ट्रेलरची स्कूटीला धडक; दोन महिला रुग्णालयात दाखल

उरण : खोपटे येथील अनियंत्रित बसमुळे झालेल्या अपघाताची घटना ताजीच असताना चिरनेर-गव्हाण फाटा रस्त्यावर मालवाहू ट्रेलरला सोमवारी अपघात झाला. सदर अपघातात स्कूटीवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या. सदर जखमी महिलांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बेशिस्त अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे साई-चिरनेर-गव्हाण फाटा, विंधणे - दास्तान फाटा आणि चिरनेर-खोपटा या प्रवासी नागरिकांच्या रस्त्यावर रात्री-अपरात्री अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात नुकताच खोपटा गावातील निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाला खोपटा रस्त्यावर झालेल्या अपघातात आपले प्राण गमवावे लागले असताना विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील वळणावरील रस्त्यावर सोमवारच्या सुमारास मालवाहू ट्रेलरला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघात ट्रेलरवरील कंटेनर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्कूटीवर पलटी होण्याची घटना घडली. मात्र स्कूटीवरून जाणाऱ्या दोन महिला थोडक्यात बचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in