नवी मुंबई : राज्यातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यकाळ पूर्ण केलेल्या सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी नवे १७ पोलीस निरीक्षक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. बदली झालेल्या या अधिकाऱ्यांना संबधित घटक प्रमुखांनी त्यांच्या बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाट न पाहता त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे सूचित केले आहे. तसेच जे पोलीस अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करून देखील वेळेत बदलीवर हजर होणार नाहीत, अशा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात घटकप्रमुखांनी शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
पोलीस आस्थापना मंडळातर्फे प्रत्येक आयुक्तालयात सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश रविवारी काढण्यात आले आहेत. यात विश्वनाथ तुकाराम कोळेकर, भागुजी नानाभाऊ औटी, रवींद्र विनायकराव पाटील, मधुकर वामनराव भटे, बासितअली सत्तार अली सय्यद, राजीव यादवराव शेजवळ, भास्कर हंबीरराव कोकरे, सुहास वामनराव चव्हाण आणि अतुल अशोक आहेर यांचा समावेश आहे.
१७ नव्या अधिकाऱ्यांची यादी
बदलीमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात रिक्त होणाऱ्या जागी राज्यातील इतर भागातून बदली झालेले १७ नवे अधिकारी नवी मुंबई आयुक्तालयात दाखल होणार आहेत. बाळकृष्ण साहेबराव सावंत (पिंपरी-चिंचवड), देवेंद्र रामचंद्र पोळ (रायगड), दीपक विजय सुर्वे (मुंबई शहर), नंदकुमार मोहनराव कदम (नाशिक ग्रामीण), संदीप विठ्ठल निगडे (मुंबई शहर), दीपक राजाराम चव्हाण (मुंबई शहर), अर्जुन रामकृष्ण रजाने (मुंबई शहर), संजय मधुकर धुमाळ (राज्य पोलीस नियंत्रण कक्ष मुंबई) तसेच विकास शिवाजी घोडके (ठाणे शहर), स्मिता वाल्मिक ढाकणे (लोहमार्ग, मुंबई), किशोर नंदकुमार साळवी (मुंबई शहर), भास्कर हंबीरराव कोकरे (मुंबई शहर), अश्विनी संतोष पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अतुल जगन्नाथ दहिफळे (विशेष सुरक्षा विभाग), राहुल रामजी काटवानी (विशेष सुरक्षा विभाग), देवीदास प्रभाकर कठाळे (गोंदिया) आणि मिलिंद रामप्रताप हिवाळे-(रायगड) यांची नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे.