वाशीमध्ये दोन कार जळून खाक; कारचालकाने तत्काळ कारमधून पळ काढल्याने बचावला

वाशी येथून सीवूड्स येथे जात असलेल्या फोर्ड कारने अचानक पेट घेतला. कारचालकाने तत्काळ सदर कार रस्त्याच्या बाजूला उभी करून कारमधून पळ काढल्याने तो बचावला
वाशीमध्ये दोन कार जळून खाक; कारचालकाने तत्काळ कारमधून पळ काढल्याने बचावला

नवी मुंबई : वाशी येथून सीवूड्स येथे जात असलेल्या फोर्ड कारने अचानक पेट घेतला. कारचालकाने तत्काळ सदर कार रस्त्याच्या बाजूला उभी करून कारमधून पळ काढल्याने तो बचावला; मात्र त्यामुळे रस्त्याच्या बाजूला पार्क असलेल्या मारुती कारनेसुद्धा पेट घेतल्याने या आगीत दोन्ही कार जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सीवूड्स येथे राहणारा बापू वाघ हा सोमवारी सकाळी फोर्ड कार घेऊन बदलापूर येथे गेला होता. त्यानंतर तो सायंकाळी वाशी मध्ये आला होता. सायंकाळच्या सुमारास वाशीतील जुहूगाव येथून पामबीच मार्गे सीवुड्स येथे जात असताना, एम जी कॉम्प्लेक्स लगतच्या रस्त्यावर कारमधून धूर येत असल्याचे कारचालक बापू वाघ याच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने तत्काळ रस्त्याच्या बाजूला आपली कार उभी करून त्यातून बाहेर पळ काढला. त्यानंतर काही वेळातच कारने पेट घेतला; मात्र सदर कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मारुती कारजवळ असल्याने त्या कारला देखील आग लागली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच जवानांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेऊन दोन्ही कारला लागलेली आग आटोक्यात आणून विझवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in