उरणमध्ये एकाच दिवशी दोन मृतदेह सापडले

सध्या लोकसभा निवडणुकीबरोबरच जत्रोत्सव-लग्न सोहळ्याची सर्वत्र धामधूम सुरू आहे. त्यातच उरण तालुक्यात एकाच दिवशी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने खळबळ...
उरणमध्ये एकाच दिवशी दोन मृतदेह सापडले

उरण : सध्या लोकसभा निवडणुकीबरोबरच जत्रोत्सव-लग्न सोहळ्याची सर्वत्र धामधूम सुरू आहे. त्यातच उरण तालुक्यात एकाच दिवशी दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. चिरनेर-दिघाटी या वर्दळीच्या रस्त्यावर गुरुवारी सकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला, तर उरण कोटनाका परिसरात एका खड्ड्यात अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे.

पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी चिरनेर-दिघाटी या वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला नाल्यातून दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. सदर नागरिकांनी दुर्गंधी कुठून येते यांची पाहणी केली असता, एक साधारण ३० ते ३५ वर्षांची महिला मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. हा मृतदेह ४-५ दिवसांपासून येथे पडून असल्यामुळे तो खराब होण्यास सुरुवात झाली होती. या महिलेचा खून करून येथे टाकण्यात आला आहे की तिचा अपघात झाला आहे, याबाबत पोलीस शोध घेत आहेत, तर उरण काळाधोंडा परिसरात पाण्याच्या खड्ड्यात एका ४०-४५ वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह सापडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in