उरण रेल्वे स्थानकासमोरील अनधिकृत झोपड्या हटविल्या

रोजी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने उरण रेल्वे स्थानकासमोरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली
उरण रेल्वे स्थानकासमोरील अनधिकृत झोपड्या हटविल्या

उरण : रोजी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने उरण रेल्वे स्थानकासमोरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. यामध्ये जेएनपीटी कामगार वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील टपऱ्या, हॉटेल्स, पदपथावरील दुकाने, टपऱ्या, कार्यालये आदींवर जेसीबी चालवीत ही बांधकामे हटविण्यात आली. बोकडविरा ते कोटनाका पर्यंतच्या दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. प्रचंड फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. यावेळी सिडकोचे अधिकारी, सुरक्षा रक्षक, पोलीस व कर्मचारी यांचा समावेश होता.

सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून ही व्यावसायिक दुकाने थाटली होती. यामध्ये मोठमोठाली मार्बलची, स्टीलची गोदामे, गॅरेज, फर्निचर बनविणारे कारखाने होते. सिडकोची ही कारवाई तीन दिवस सुरू राहणार असल्याचे समजते. या कारवाईत जवळ जवळ ६५ पक्की बांधकामे, पत्र्याचे शेड असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in