अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला

उरण तालुक्यातील हिंद कंटेनर टर्मिनल येथे परदेशातून आलेल्या टायर कंटेनरमध्ये तब्बल उत्तर अमेरिकन खंडातील ‘कॉर्न स्नेक’ किंवा ‘रेड रॅट स्नेक’ हा विदेशी प्रजातीचा साप आढळून आला आहे. कंटेनर तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांना हा साप दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली.
अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला
अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला
Published on

उरण : उरण तालुक्यातील हिंद कंटेनर टर्मिनल येथे परदेशातून आलेल्या टायर कंटेनरमध्ये तब्बल उत्तर अमेरिकन खंडातील ‘कॉर्न स्नेक’ किंवा ‘रेड रॅट स्नेक’ हा विदेशी प्रजातीचा साप आढळून आला आहे. कंटेनर तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांना हा साप दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा कंटेनर जेएनपीटी बंदरातून परदेशातून आयात केलेल्या टायरसह उरण परिसरात आला होता. तपासणीदरम्यान एक नारंगी रंगाचा आकर्षक पट्टेरी साप दिसल्याने व्यवस्थापनाने तत्काळ बचावासाठी ‘फ्रेंड्स ऑफ नेचर’ या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे स्वयंसेवक स्वप्नील म्हात्रे यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर फॉनचे बचावकर्ते जयेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत साप सुरक्षितरीत्या पकडून त्याची काळजी घेतली. सदर साप पुढील कारवाईसाठी उरण वनविभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला
अमेरिकन सापाची उरणमध्ये एंट्री! टायरच्या कंटेनरमधून 'कॉर्न स्नेक' आढळला

सर्पतज्ज्ञांना चिंता

हा कॉर्न स्नेक बिनविषारी असून, यापासून मानवाला कोणताही धोका नाही. परंतु भारतात अशा विदेशी प्रजातींची उपस्थिती पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते. कारण त्या स्थानिक सर्पप्रजातींसाठी प्रतिकूल ठरू शकतात. त्यामुळे अशा सापांना त्यांच्या मूळ अधिवासात परत पाठविणेच उचित असल्याचे सर्पतज्ज्ञांचे मत आहे.

logo
marathi.freepressjournal.in