द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणी

सिडको व्यवस्थापनाने खासगी विकासकांच्या (बिल्डर) माध्यमातून उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात रहिवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. शहरी जीवन सुकर असते, म्हणून द्रोणागिरी नोडमध्ये नागरिकांनी घरे घेतली
द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणी

उरण : उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. द्रोणागिरी नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत व कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. सिडको प्रशासनाने पाणीपुरवठा समस्येवर योग्य ते नियोजन केले नाही, तर चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांनी उरण तहसील कार्यालयावर काढलेल्या हंडा मोर्चाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

सिडको व्यवस्थापनाने खासगी विकासकांच्या (बिल्डर) माध्यमातून उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात रहिवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. शहरी जीवन सुकर असते, म्हणून द्रोणागिरी नोडमध्ये नागरिकांनी घरे घेतली; मात्र नागरी सुविधांचा अभाव त्यात अनियमित व पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा नागरिक आपसात पैसे काढून टँकर घेऊन येत आहेत.

व टँकरच्या माध्यमातून उंच इमारतीत पाणी घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे या द्रोणागिरी नोडमधील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे.याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. द्रोणागिरी नोडमधील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक अर्ज विनंती केल्या आहेत; मात्र याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही लोकप्रतिनिधी देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे द्रोणागिरी नोड मधील नागरिक हैराण झाले आहेत.

अनेक समस्यांनी रहिवासी त्रस्त

एकंदरीत नागरी सुविधांचा अभाव त्यात पाणीटंचाईचे संकट अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त झालेल्या रहिवाशांनी सध्या द्रोणागिरी नोड येथे न राहणे पसंत केले आहे. तसेच काही रहिवासी हे चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांनी पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी उरण तहसील कार्यालयावर काढलेल्या हंडा मोर्चाची पुनरावृत्ती संबंधित प्रशासनावर करण्याचा निर्णय घेत आहेत.

मी गेल्या एक वर्षापासून द्रोणागिरीमध्ये राहत आहे; मात्र येथील पाणी समस्या पाहता पुन्हा एकदा गावी जाण्याचाच विचार करतोय, कारण कित्येकदा पत्र, अर्ज विनंती करून देखील येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.

- सुनील ठाकूर, रहिवासी, द्रोणागिरी नोड

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in