उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

जेएनपीए बंदरातील कंटेनर वादळी वाऱ्याने पडून झालेल्या अपघातामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू
उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

उरण : जेएनपीए बंदरातील कंटेनर वादळी वाऱ्याने पडून झालेल्या अपघातामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बंदरात उभ्या असलेल्या तेलाच्या टँकरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर हे कंटेनर पडून अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत कामगाराचा मृतदेह शवविच्छेदानासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

या अपघातामध्ये बिहार येथील अमितकुमार किशोर प्रसाद याचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी आहेत. वाऱ्यामुळे जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फ्रिपोर्ट टर्मिनलला उभ्या असणाऱ्या जहाजामधून रिकामे कंटेनर बंदरात उभ्या असणाऱ्या तेलाच्या टँकरवर पडले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in