पनवेलमध्ये राहुल गांधींचा जोरदार निषेध

विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत आणि त्यामुळेच ते जातीपातीचे मुद्दे काढत आहेत, असा आरोपही यावेळी आंदोलनातून करण्यात आला.
पनवेलमध्ये राहुल गांधींचा जोरदार निषेध
Published on

पनवेल : भाजप पक्षाच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा जोरदार निषेध करण्यात आला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, असे वादग्रस्त विधान राहुल गांधी यांनी केले आहे. या विरोधात देशभर संतापाचा भडका उडाला आहे. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणा करत निषेध करण्यात आला.

मोदीजी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान! अशा प्रकारच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत आणि त्यामुळेच ते जातीपातीचे मुद्दे काढत आहेत, असा आरोपही यावेळी आंदोलनातून करण्यात आला. यावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, अमित ओझे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजेश्री वावेकर, सुहासिनी केकाणे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, रोहित जगताप, रुपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, चंद्रकांत मंजुळे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अभिषेक भोपी, कोमल कोळी, संदीप पाटील, तेजस जाधव, देवांशू प्रभाळे, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in