नवी मुंबई : पाणीकपातीत वाढ; आठवड्यातील ३ दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद

अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाईची समस्या उद्‌भवू नये, यासाठी महापालिकेने आतापासूनच पाणीकपातीत वाढ करून शहरात विभागनिहाय ३ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : पाणीकपातीत वाढ; आठवड्यातील ३ दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद
Published on

नवी मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाने दडी मारल्याने नवी मुंबईकर आतुरतेने पावसाची वाट बघत आहेत. स्वतःचे जलाशय अर्थात धरण असणाऱ्या नवी मुंबईकरांवर देखील आता पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात नवी मुंबईकरांना किमान जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करता येईल इतका जलसाठा शिल्लक आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाईची समस्या उद्‌भवू नये, यासाठी महापालिकेने आतापासूनच पाणीकपातीत वाढ करून शहरात विभागनिहाय ३ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यापूर्वी पावसाचे आगमन गृहित धरून महापालिकेने ४ जूनपासून नोडनिहाय आठवड्यातून २ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, मोरबे धरणातील जलाशयामध्ये होत असलेली घट आणि अपेक्षेप्रमाणे पाऊस न बरसल्याने आता आठवड्यातून ३ दिवस नोडनिहाय पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ नवी मुंबई महापालिकेवर ओढवली आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेचे अतिरीक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले आहे.

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण परिसरात पाऊस खूपच कमी बरसला आहे. परिणामी, मोरबे धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत असल्याने नवी मुंबईकरांची तसेच महापालिकेची चिंता वाढली आहे. पाऊस जर लांबला तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यासाठी संभाव्य पाणी समस्येवर उपाययोजना म्हणून नवी मुंबई महापालिकेने शहरात केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच मोरबे धरणात शिल्लक असलेला पाणी साठ्याचा जपून वापर व्हावा यासाठी महापालिकेने याआधी विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता नवी मुंबईमध्ये विभागनिहाय आठवड्यातील दोन दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.

सदर निर्णयाची १३ जूनपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in