बेलापूर, नेरूळ, तुर्भे येथे आज पाणीपुरवठा बंद

भोकरपाडा येथील महावितरण सब स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
बेलापूर, नेरूळ, तुर्भे येथे आज पाणीपुरवठा बंद
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी मुंबई : भोकरपाडा येथील महावितरण सब स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई मनपाचे भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी नवी मुंबईतील काही भागांत मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील १००/२२ के.व्ही. सब स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्याचा प्रभाव नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात पडणार असून या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. बुधवारी नियमित दाबाने पाणी पुरवठा होईल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in