अलिबागचा पांढरा कांदा उरण बाजारात दाखल

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळला फारशी पिके घेतली जात नाही, पण...
अलिबागचा पांढरा कांदा उरण बाजारात दाखल
Published on

उरण : रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळला फारशी पिके घेतली जात नाही, पण गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने पांढरा कांदा पिकांची लागवड होऊ लागली आहे. या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने हे मानांकन बहाल केले गेले. त्यामुळे रूचकर चव आणि औषधे गुणधर्म असलेल्या या कांद्याला मागणी वाढली आहे. दरही चांगला मिळत आहे.

औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी उरण बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. परराज्यातून देखील या मागणी असून औषधी गुणधर्म युक्त आणि चविष्ट कांदा असल्याने पांढरा कांदा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.

logo
marathi.freepressjournal.in