पतीला कामाला जायला उशीर झाल्यामुळे भांडण झाले, रागात पत्नीने टोकाचे पाऊल उचलले

नवी मुंबईच्या वाशीमधील घटना, पतीसोबत झाला होता किरकोळ वाद
पतीला कामाला जायला उशीर झाल्यामुळे भांडण झाले, रागात पत्नीने टोकाचे पाऊल उचलले

नवी मुंबई : पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाशी सेक्टर-१४ मध्ये मंगळवारी सकाळी घडली. वाशी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव माधवी वैभव केंजळे असे असून, ती वाशी सेक्टर-१४ मधील गंगासागर सोसायटीत पतीसह राहण्यास होती.

मंगळवारी सकाळी माधवीचा पती वैभव याला कामावर जाण्यास उशीर होत होता. याच कारणावरून माधवी व वैभव या पतीपत्नीमध्ये बाचाबाची झाली. या गोष्टीचा राग आल्याने माधवीने घरातील बेडरुममध्ये जाऊन गळफास घेतला. हा प्रकार वैभवच्या लक्षात आल्यानंतर त्याने माधवीला पीकेसी या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी महापालिका रुग्णालयात नेले; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in