विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

झटका लागल्याने सुरज हा जोरात ओरडून पोलवरच बेशुद्ध झाला. सुरज पोलवरून पडू नये म्हणून शैलेशने पकडून ठेवले.
विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
Published on

अलिबाग : विद्युत खांबावर काम करीत असताना अचानकपणे विजेचा झटका लागल्याने सूरज रामचंद्र मिसाळ (४०) या वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सी गल सोसायटी परिसरात घडली.

अलिबाग तालुक्यातील विद्यानगर येथे सी गल सोसायटीसमाेरील एमएसईबीच्या लोखंडी पोलवर काम करीत असताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सूरज रामचंद्र मिसाळ याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद शैलेश गजानन मते (४०) यांनी दिली आहे. शैलेश मते यांच्यासहित मृत सुरज रामचंद्र मिसाळ, दयानंद गजानन घरत, मकरंद पाटील व मयुर असे चौघेजण विद्यानगर येथील सी-गल सोसायटीसमोरील एमएसईबीच्या लोखंडी विजेच्या पोलजवळ काम करीत असताना शैलेश मते व सूरज हे पोलवर चढले होते.

दयानंद, मकरंद व मयुर असे पोलखाली काम करीत होते. सुरज मिसाळने हाताने केबल पकडलेली होती. शैलेश मते ती पाण्याने फिट करीत असताना अचानक केबलमध्ये इंडक्शन येऊन शैलेशच्या उजव्या हाताला व सुरजला विजेचा झटका लागला. झटका लागल्याने सुरज हा जोरात ओरडून पोलवरच बेशुद्ध झाला. सुरज पोलवरून पडू नये म्हणून शैलेशने पकडून ठेवले. त्यानंतर सूरजला उपचाराकरिता रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टारांनी सूरजला मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in