घरात 'वेश्याव्यवसाय' चालविणारी महिला अटकेत

वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या दिघा येथील साठे नगरमधील एका घरावर रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून छापा मारून घरात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
घरात 'वेश्याव्यवसाय' चालविणारी महिला अटकेत

नवी मुंबई : वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या दिघा येथील साठे नगरमधील एका घरावर रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून छापा मारून घरात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी बोलावण्यात आलेल्या तीन महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घरामध्ये मागील काही दिवसांपासून वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

दिघा साठे नगरमधील एका घरात राहणारी ५८ वर्षीय महिला आपल्या घरात वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती एका जागृत नागरिकाने ११२ या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईनवर दिली होती. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गत २९ जानेवारी रोजी दुपारी सदर घरावर छापा मारला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in