महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिला दलाल अटकेत

पोलिसांनी या कारवाईत वेश्यागमनासाठी बोलावण्यात आलेल्या एका महिलेची सुटका केली आहे.
महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिला दलाल अटकेत

गरजवंत तरुणी तसेच महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन दलाल महिलांना व वेश्यागमनासाठी आलेल्या व्यक्तीला कामोठे पोलिसांनी सोमवारी सापळा रचून अटक केली आहे. उपासना मल्ला (३४ ) व आरती रोकडे (२८ ) अशी दलाल महिलांची नावे असून त्या कामोठे सेक्टर-१६ मधील एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होत्या. पोलिसांनी या कारवाईत वेश्यागमनासाठी बोलावण्यात आलेल्या एका महिलेची सुटका केली आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेली उपासना मल्ला या महिलेने कामोठे सेक्टर-१६ मध्ये एक फ्लॅट भाडयाने घेतला होता. त्यांनतर तीने वेश्यागमनासाठी महिला पुरविण्यास सुरुवात केली होती. तिच्याकडे वेश्यागमनासाठी कुणी व्यक्ती आल्यास ती गरजवंत महिला व तरुणींना ४ हजार रुपयांमध्ये वेश्यागमनासाठी तयार करत होती. हा सर्व प्रकार कामोठे मधील ती राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गेल्याकाही महिन्यांपासून सुरू होता. याबाबतची माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी दुपारी बनावट ग्राहकाला सदर महिलेच्या फ्लॅटवर वेश्यागमनासाठी पाठवून सापळा लावला होता.

त्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने सदर फ्लॅटवर छापा मारला असता, सदर फ्लॅटमध्ये एक महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत उपासना मल्ला व आरती रोकडे या दोघी वेश्यागमनासाठी महिला व तरुणींना पुरवित असल्याचे तसेच त्या गरजवंत महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे आढळून आले. तसेच त्या ग्राहकांकडून ४ हजार रुपये घेऊन त्यातील फक्त १५०० रुपये वेश्यागमन करणाऱ्या महिलांना देत असून उर्वरीत सर्व रक्कम त्या स्वत: ठेवून घेत असल्याचेही आढळून आले.

पोलिसांनी उपासना मल्ला व आरती रोकडे त्याचप्रमाणे सदर फ्लॅटमध्ये वेश्यागमन करताना सापडलेल्यां विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in