वाशी पालिका रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

वाशी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
वाशी पालिका रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

नवी मुंबई : वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात मेन्टेनन्सचे काम करणाऱ्या मुकेशकुमार मगरतुरी (२२) कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावरून खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मुकेशकुमार मगरतुरी हा कामगार दिनकर पिसे या कंत्राटदाराच्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या मेंटेनन्सचे काम करत होता. तसेच तो रुग्णालयातच राहत होता. रविवारी दुपारी ११:३० वाजण्याच्या सुमारास मुकेशकुमार हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर पत्र्याच्या शेडवर चढून प्लंबिंगचे काम करत होता. यावेळी मुकेश कुमार याचा तोल गेल्याने तो पत्र्याच्या शेडवरून खाली पडला. या दुर्घटनेत मुकेशकुमार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला महापालिकेच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मुकेश कुमार याचा मृत्यू झाला. वाशी पोलिसांनी या दुर्घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in