Yashashree Shinde Murder: २०१९ मधील 'त्या' घटनेचा बदला म्हणून उरणच्या यशश्री शिंदेची केली निर्घृण हत्या?

“तो २०१९ मध्ये उरणमध्ये मजूर म्हणून काम करत होता, तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली. मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या मैत्रीबद्दल कळल्यानंतर...
Yashashree Shinde Murder: २०१९ मधील 'त्या' घटनेचा बदला म्हणून उरणच्या यशश्री शिंदेची केली निर्घृण हत्या?
Published on

उरणमधील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्येनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तिच्या गुप्तांगासह शरीरावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. एकतर्फी प्रेमातून संशयीत आरोपी दाऊद शेख याने तिची हत्या केल्याची शक्यता असून तो अद्यापही फरार आहे.

जोपर्यंत आरोपीला पकडत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी रविवारी घेतली होती. मात्र, पोलीस आणि यशश्री शिंदेच्या कुटुंबीयांनी समजूत काढल्यानंतर अखेर शोकाकुल वातावरणात प्रचंड लोकांच्या उपस्थित तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

२०१९ मध्ये यशश्रीच्या वडिलांनी केली होती मारहाण-

दरम्यान, २०१९ मध्ये यशश्री आणि दाऊदच्या नात्याबाबत समजल्यावर यशश्रीच्या वडिलांनी दाऊदला भररस्त्यात मारहाण केली होती. तो यशश्री शिंदे हिला पाच वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. “तो २०१९ मध्ये उरणमध्ये मजूर म्हणून काम करत होता, तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली. मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या मैत्रीबद्दल कळल्यानंतर, वडिलांनी सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर हल्ला केला आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता, ”असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वडिलांबाबत मनात राग होता?

या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शेख कर्नाटकला गेला. कॉल रेकॉर्डवरून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्यामुळे आणि तुरूंगात जावे लागल्यामुळे शेखच्या मनात तिच्या वडिलांबद्दल राग होता अशी आम्हाला शंका आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कर्नाटकात बस चालक म्हणून काम करणाऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. “एक टीम आधीच कर्नाटकला रवाना झाली आहे आणि आम्ही त्याच्या घराचा पत्ताही शोधला आहे. त्याला लवकरच अटक होईल, असे पोलिस उपायुक्त (झोन II) विवेक पानसरे यांनी सांगितले.

२५ जुलैपासून यशश्री शिंदे बेपत्ता होती. कोटनाका पेट्रोल पंपाजवळ तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येची माहिती शनिवारी ( दि२७ ) पहाटेच्या सुमारास उरण पोलीसांना मिळताच पोलिसांनी तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसही मृतदेहाची अवस्था पाहून हादरुन गेले होते.

logo
marathi.freepressjournal.in