लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

उरणच्या मोरा परिसरात राहणाऱ्या प्रविण पाटील तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबध ठेवून ती गरोदर राहिल्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

नवी मुंबई : उरणच्या मोरा परिसरात राहणाऱ्या प्रविण पाटील तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबध ठेवून ती गरोदर राहिल्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोरा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी प्रविण पाटीलविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील आरोपी तरुण व तरुणी हे दोघेही मोरा परिसरात राहण्यास असून आरोपी प्रविण पाटील याने पीडित तरुणीसोबत प्रेमसंबध निर्माण केले होते. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा जबरदस्तीने शरीरसंबध ठेवले. त्यामुळे पीडित तरुणी सहा महिन्याची गरोदर राहिल्यानंतर पीडित तरुणीने प्रविण पाटीलकडे लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र प्रविण पाटीलने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर पीडित तरुणीने मोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रविण पाटील विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in