अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

उलवे भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या ९ वर्षीय मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये तसेच इमारतीच्या आवारात लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
Published on

नवी मुंबई : उलवे भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या ९ वर्षीय मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये तसेच इमारतीच्या आवारात लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहम्मद अकीब नौशाद अली (२२) असे या आरोपीचे नाव असून उलवे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेतील ९ वर्षीय पीडित मुलगी उलवे परिसरात राहण्यास असून सोमवारच्या सुमारास ती उलवे परिसरातील खासगी शिकवणीसाठी सायकलने जात होती. यावेळी पीडित मुलीची सायकल खराब झाल्याने आरोपी मोहम्मद अकीबने तिला मदत करत असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने पीडित मुलीला सेक्टर-९ मधील शिकवणी असलेल्या इमारतीत सोडण्याचा बहाणा करून तिला लिफ्टमध्ये नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन सुरू केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीला त्याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये नेऊन तिच्यासोबत लैंगिक चाळे केले, त्यानंतर या आरोपीने पलायन केले. घाबरलेल्या पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर त्यांनी उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in