विद्रुप चेहरा आणि फाटलेला मुखवटा

सत्ता गमावल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वैफल्य आलेले असून आततायीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून ते महायुतीवर अभद्र भाषेत टीका करत आहेत.
विद्रुप चेहरा आणि फाटलेला मुखवटा
Published on

मत आमचेही

- केशव उपाध्ये

सत्ता गमावल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वैफल्य आलेले असून आततायीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून ते महायुतीवर अभद्र भाषेत टीका करत आहेत. विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाची घोषणा करावी, हा त्यांचा आग्रह काँग्रेस आणि शरद पवार या दोघांनीही फेटाळला आहे. जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री, हे सूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आहे. भाजपचेही हेच धोरण होते. आता उद्धव ठाकरे यांना मुखवटे व चेहरे यातील फरक कळला असेल.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास 3 आघाडीचे सरकार सत्तेतून गेल्यानंतर त्यांच्या गटाला, काँग्रेसला आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसणे स्वाभाविक होते. मोठ्या परिश्रमाने तीन पक्षांचे जुगाडू सरकार म्हणजे कायमस्वरूपी सत्तेचा अमरपट्टा आहे, अशा थाटाचे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांचे वर्तन होते. सत्ता गेल्यामुळे आलेल्या वैफल्यातून हे तिन्ही पक्ष अजून सावरलेले नाहीत. त्यातूनच महायुती सरकारला विरोध करताना आततायीपणाच्या, अतिरेकाच्या सर्व मर्यादा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओलांडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत खोट्यानाट्या अफवा पसरवून मिळवलेल्या यशामुळे उबाठा गट भलताच हवेत चालला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते वेगळी असतात. हे ठाऊक नसल्याने वारंवार लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दाखला देऊन आता विधानसभा आमचीच अशा आवेशात उबाठा आणि त्यांचे चेलेचपाटे वावरत होते. त्यांना पहिला धक्का दिला तो काँग्रेस आणि शरद पवार यांनी. विधानसभा निवडणुकीसाठी उबाठांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करा, अशी आर्जवे उबाठांच्या झिलकऱ्यांनी पवार साहेबांकडे आणि काँग्रेस नेतृत्वाकडे वारंवार केली. त्यासाठी एरवी मातोश्रीचा उंबरठा ओलांडणे म्हणजे पाप आहे, अशी समजूत करून घेऊन वावरणाऱ्या उबाठांना चक्क मुंबई सोडून दिल्ली गाठावी लागली. सोनिया गांधी यांनी उबाठांना बहुदा भेटीची वेळही दिली नसावी. त्यामुळे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीवर त्यांना समाधान मानावे लागले. शरद पवार आणि नाना पटोले या दोघांनीही महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करणार नाही, असे स्पष्टपणे सांगून टाकले. उद्धवरावांना

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक भ्रम झाले होते. काँग्रेस आणि शरद पवारांना आपल्याशिवाय पर्याय नाही, लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचे श्रेय फक्त आपल्या एकट्याचे आहे, अशा भ्रमात उबाठा आणि त्यांचे समर्थक वावरत होते. उबाठांचे हे हवेत गेलेले विमान शरद पवार आणि काँग्रेस नेतृत्वाने एका फटक्यात जमिनीवर आणले. एवढे झाल्यानंतरही उबाठांचा आपल्या चेहऱ्याविषयीचा आग्रह कमी झाला नाही. जाहीरपणे नव्हे तर खासगी चर्चेत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी काकुळतीची भाषा उद्धव ठाकरेंना करावी लागली. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे आपल्याला सर्वाधिक जागा देण्यात याव्यात, ही उबाठांची इच्छा शरद पवार आणि काँग्रेसने मनावर घेतली नाही. त्यामुळेच विधानसभेच्या जागावाटपात उबाठांना १०० • पेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागणार आहे, अशी स्थिती आहे. जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्याच पक्षाचा मुख्यमंत्री अशी सुस्पष्ट भूमिका ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री मध्ये झाली त्याच सूत्र होते. आर्जवे, आणि हळूहळू वाजपेयी, भाजपच्या कायम राष्ट्रीय नेतृत्वाकडे शिवसेना याची पक्की काँग्रेस विधानसभा पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली आहे. १९८९ म्हणून करावी लागणार, अशी स्वप्ने दिवसाढवळ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तेव्हापासून, 'जो पक्ष जास्त जागा जिंकेल पक्षाचा मुख्यमंत्री' हेच युतीचे जागावाटपाचे भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुकीच्या जागावाटपात कधीही काकुळतीने विनंत्या करण्याची वेळ आली नव्हती. चेहरे मुखवटे यातील फरक उबाठा गटाला आता कळू लागला असेल. अटलबिहारी लालकृष्ण अडवाणी या त्यावेळच्या केंद्रीय नेतृत्वाने वंदनीय बाळासाहेबांचा सन्मानच केला. वंदनीय बाळासाहेबांनीही लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत असताना मंत्रिपदासाठी व अन्य सत्तापदांसाठी भाजप कधीच हट्ट धरला नाही. भाजप युती ही हिंदुत्व आणि राष्ट्रवादासाठी आहे, कल्पना वंदनीय बाळासाहेबांना होती. नेतृत्वाने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणुकीसाठी तयारी चालू केल्यानंतर आपल्याच नावाची घोषणा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार पाहणाऱ्या उबाठांना वस्तुस्थितीचे चटके आता बसू लागले आहेत. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याचा आणि महायुती सरकारवर विखारी, अभ्रद भाषेत टीका करण्यात उबाठा आणि त्यांचे चिरंजीव धन्यता मानू लागले आहेत.

मालवण येथील राजकोट किल्ल्यात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घटना घडल्यानंतर उबाठा आणि त्यांच्या चिरंजिवांनी महायुती सरकारवर नेहमीप्रमाणे गरळ ओकणे चालू केले. उबाठा मुख्यमंत्री असताना शेजारच्या कर्नाटकमध्ये बेळगावजवळ छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोजर लावून हलवण्याची घटना घडली होती. काँग्रेस आमदाराच्या आग्रहामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा हलविला गेला होता. त्यावेळी त्या काँग्रेस आमदाराचा निषेध करण्याची हिंमतही उबाठा आणि त्यांच्या चेल्यांना दाखवता आली नाही. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनेकवेळा अभद्र भाषेत टीका केली. तरीही उबाठांना राहुल गांधींचा निषेध करण्याचे धाडस दाखवता आले नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले दैवत मानत असत. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या या दैवतालाच विसरण्याइतपत लाचारी दाखवावी लागली. छत्रपती शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाला केलेली शिक्षा त्यांच्या कर्तव्यकठोर कारभाराचे उदाहरण म्हणून नेहमी सांगितले जाते. बदलापूर घटनेनंतर महिला अत्याचाराविषयी गळा काढणाऱ्या उबाठांना स्वप्ना पाटकरचा आकांत कधीच जाणवतही नाही. उबाठांचा चेहरा आणि मुखवटा याचे विद्रुप दर्शन आता नेहमीचेच झाले आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत विद्रुप चेहरा आणि फाटलेला मुखवटा वारंवार सहन करावा लागणार आहे.

(लेखक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in