मनारोग्य : जास्त मित्र असणे धोकादायक?

आधुनिक रिलेशनशिप तज्ञांच्या मते जास्त मित्र असणे ही बाब तोट्याची ठरते. उत्तम मानसिक आरोग्यासाठी प्रत्येकाला केवळ चार ते पाचच मित्र असावेत असा सल्ला ते देतात.
मनारोग्य : जास्त मित्र असणे धोकादायक?
Published on

लेखक : डॉ. महेश दळे

आधुनिक रिलेशनशिप तज्ञांच्या मते जास्त मित्र असणे ही बाब तोट्याची ठरते. उत्तम मानसिक आरोग्यासाठी प्रत्येकाला केवळ चार ते पाचच मित्र असावेत असा सल्ला ते देतात.आयुष्यात किती मित्र आवश्यक असतात? कुणालाही जादा मित्र असणे चांगले वाटते खरे, परंतु अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात दावा करण्यात आला आहे की जास्त मित्र असणे ही चांगली गोष्ट नाही. चारपेक्षा जास्त मित्र असल्याचा नकारात्मक परिणाम होतो.

सध्याच्या ‘सोशल मीडिया’च्या युगात मित्रांचे मोठे नेटवर्क असणे स्वाभाविक आहे; पण ब्रिटनच्या प्रसिद्ध लेखक आणि रिलेशनशिप एक्स्पर्ट एलिझाबेथ डे म्हणतात, की खूप जवळचे मित्र असण्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एलिझाबेथ ‘फ्रेन्डाहोलिक’ मध्ये म्हणाल्या, की पाचपेक्षाही कमी म्हणजे फक्त चारच मित्र असणे केंव्हाही चांगले! एलिझाबेथने तिच्या ‘फ्रेन्डाहोलिक’ या नवीन पुस्तकात चार ते पाच मित्र चांगल्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले आहे. यापेक्षा जास्त असतील तर फायदा कमी होतो. सातपेक्षा जास्त मित्र असण्याची प्रवृत्ती नैराश्याच्या वाढलेल्या लक्षणांशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. एलिझाबेथने ही वस्तुस्थिती स्वतःशी ताडूनही पाहिली आहे.

टाळेबंदीमध्ये बराच काळ एकटेपणा जाणवत असल्याने तिने खूप मित्र बनवले आणि त्यांच्याशी जोडले गेले; पण सर्वांशी संपर्क राखणे शक्य नव्हते. त्यापैकी अनेकांना मी ओळखतही नव्हते. त्यांच्यापैकी काही लोक वाईट मित्र असल्याचे नंतर सिद्ध झाले. संकटसमयी तुमच्या पाठीशी खात्रीने उभे राहणारे लोक मोजकेच असतात. आपल्या पुस्तकात चार ते पाच मित्र चांगल्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. एलिझाबेथ यांचे अनेक गर्भपात झाले आहेत. त्या म्हणतात की, अशा दुःखाच्या क्षणांमुळे तुमचे मित्र खरोखर कोण आहेत हे कळते. मी भाग्यवान आहे, की मला असे मित्र मिळाले.

एलिझाबेथ यांनी भारत आणि आशियाई देशांच्या अभ्यासाचे उदाहरण दिले. त्यानुसार येथील लोक मैत्रीमध्ये समानता आणि संस्कृतीला महत्त्व देतात, म्हणूनच मैत्री दीर्घकाळ टिकते. मोठे वर्तुळ म्हणजे अधिक मित्र असणे आवश्यक नाही. ‘जर्नल पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, लोक कमी मित्र असलेल्या लोकांशी संपर्क साधण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे कमी मित्र असणे ही बाब केव्हाही चांगलीच म्हणायला हवी.

logo
marathi.freepressjournal.in