भविष्यातील तरतुदीसाठी गुंतवणूक

तुमची सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे म्हणजे बाजारात व्यवहार होतात, कसे करायचे याची तुम्हाला माहिती आहे.
भविष्यातील तरतुदीसाठी गुंतवणूक

कोविडनंतर मला मिळणारा निव्वळ परतावा बाजार पुरेसा वाढूनही अपेक्षित नाही. त्यामुळे मी नाखूश आहे. मी काय करू? माझी सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे. दीर्घकाळ थांबायची माझी तयारी आहे.

तुमची सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे म्हणजे बाजारात व्यवहार होतात, कसे करायचे याची तुम्हाला माहिती आहे. अशी माहिती नसेल, तर व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची सेवा तुम्ही घेऊ शकता. त्याला फी देऊ शकता. तुम्ही नाखूश आहात याचा अर्थ काय? तुम्हाला खूश करणं हे बाजाराचं काम नाही. बाजार आपली दिशा ठरवेल. नाखूश असायला अनेक कारणं कायम सापडतील. इंडेक्स १२% रिटर्न देतोय आणि तुमचा फोलिओ ११% च वाढला म्हणून तुम्ही नाखूश. इंडेक्स १२% वाढला आणि तुमचा फोलिओ १३% वाढला, पण तो २५% का वाढला नाही म्हणून तुम्ही नाखूश व्हाल, इंडेक्स २०% वाढला, पण तुम्हाला १२% रिटर्न मिळाला तुम्ही अधिक नाराज व्हाल. अशी कारणं वेगवेगळी असू शकतील. तुमची खरेदी चुकीच्या वेळी झाली असेल. एवढं मात्र निश्चित की, तुमचा परतावा चालू बाजार परताव्यातून खूप अधिक फारसा कधी असणार नाही.

अशा वेळी सल्लागाराची मदत घ्यावी किंवा त्याच्याशी चर्चा करावी का?

तुम्ही स्वतःच व्यवस्थापन करत असाल, तर अशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही त्याच्याशी किंवा एखाद्या योजनेशी तुलना करून पहा ना? तुम्हाला १२% परतावा मिळतोय आणि त्याला १८% मिळत असेल, तर स्वतःच मॅनेज करण्यापेक्षा त्याच्याकडे जाऊ शकता.

एका ज्येष्ठ नागरिकांनी इथे एक प्रश्न विचारला आहे की, त्याचं वय ६३ आहे. या वयात एक कोटी रुपये मिड कॅप, स्मॉल कॅप शेअरमध्ये मी गुंतवू का? हे पैसे मला पुढे किमान १० वर्ष तरी लागणार नाहीत.

याचा विचार करतानाही तुमचं भांडवल किती तेही पाहिलं पाहिजे. तुमचे येणारे उत्पन्न दरवर्षी ५ लाख असेल, तर तुमच्या निवृत्तीच्या दृष्टीने दीड कोटी मालमत्ता त्याच्याकडे असणे जरुरीचे आहे. तुमच्याकडे १० कोटी असतील, तर ही चैन परवडू शकेल, पण जर २ कोटी असतील तर तुमची मालमत्ता तुम्हाला पुरेल एवढीच आहे. मग हे धाडस तुम्ही करू नये. त्याने कदाचित तुम्ही अडचणीत येऊ शकाल. आपण पाहाल रतन टाटा, अझीम प्रेमजी यांसारख्या व्यक्ती वयाच्या ८० च्या घरात आहेत. त्यांची बहुतेक गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे, पण ती रक्कम प्रचंड असल्याने त्यात पडणाऱ्या भावातील फरकाने त्यांना काही फरक पडत नाही. वय महत्त्वाचं नाही असं मी म्हणत नाही, पण एकूण किती पैसे आहेत ते अधिक महत्त्वाचं आहे.

एक महत्त्वाचा प्रश्न आहे की, आपल्या गुंतवणूक संचाचे परीक्षण कधी करावं? त्याचे निकष नेमके काय असावेत.

वर्षातून एकदा तरी परीक्षण केलेच पाहिजे. जेव्हा कधी मोठा खर्च जसे मुलीचे लग्न, परदेशी मिळालेली शिक्षक संधी अशा प्रसंगात खूप जास्त खर्च होतो, त्यावेळी त्याचं परीक्षण करावं. मी नेहमी याची तुलना शाळेत घेत असलेल्या पालकसभेशी करतो. माझ्या मुलीच्या शाळेत अशी सभा असायची तेव्हा मी तिच्या क्लास टीचरना मी त्या सभेस यायलाच हवं का? विचारायचो ते नेहमीच तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणायचे. बहुदा त्यांच्या तिच्याविषयी तक्रारी नसाव्यात, पण त्यांनी तुम्ही यायलाच हवं सांगितले असतं तर मला जावं लागलं असतं. वर्षातून एकदा आपल्या गुंतवणुकीवर नजर टाकून त्याच्याबद्धल तक्रारी आहेत अशा अपेक्षित परतावा न देणाऱ्या गुंतवणुकीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्य गुंतवणूक तशीच ठेवावी. एका निश्चित दिवशी वर्षभरात एकदा तरी असे करावे आणि त्याच तारखेचे पुढील वर्षी पालन करावे म्हणजे त्यात एकसमानता राहते.

मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद आपण कशी करू शकतो?

तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची ही जबाबदारी आहे की त्यांनी तुम्हाला छोटी मुले असतील तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी एखादी योजना त्याचप्रमाणे तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी एक तरी योजना सुचवायला हवी. किती वर्षांचा कालावधी आहे ते पाहून गुंतवणूक मालमत्तांची समभाग आणि कर्जरोखे यांची विभागणी सुचवावी. तुमच्या मुलांना त्याच्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे पत्रक त्यात दाखवलेली वाढ ही कशी झाली समजावून सांगावे. त्यांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांनी काही मागणी केली तर यातून पैसे काढून घेऊ या का विचारावे. तो नक्कीच नको म्हणेल. तुम्ही जबाबदारीने वागत असाल तर तेही जबाबदारीने वागतील. आपोआपच तो अर्थसाक्षर होईल. सल्लागाराने योग्य अशी योजना बनवून आपल्याला समजावून द्यायला हवी. आपलं उद्दिष्ट मुलांचे उच्च शिक्षण त्यासाठी ही योजना आपल्या निवृत्तीसाठी एक योजना हवीच हवी. प्रत्येक कुटुंबाच्यासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार ती वेगळी असेल यासाठी अमुक अमुक हा एकच पर्याय नसेल. आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक केली जाईल, वाढवली जाईल आवश्यक असल्यास स्थगित केली जाईल पण काढून घेतली जाणार नाही. कर नियोजन करण्याच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. (अपूर्ण)

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in