सोमय्या यांची भावना प्रातिनिधिक आहे का ?
काऊंटर पॉइंट
-रोहित चंदावरकर
भारतीय जनता पक्षाचे एक अत्यंत सीनियर नेते आणि पक्षाचे मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वीच लिहिलेल्या एका पत्रामुळे केवळ भारतीय जनता पक्षातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातच खळबळ माजली आहे. आपल्या संमतीविना पक्षाने आपल्याला कोणतेही पद देऊ नये, असे सोमय्या यांनी सांगितले आहे. खरे तर किरीट सोमय्या हे पक्षाचे अत्यंत शिस्तबद्ध नेते, कार्यकर्ते मानले जातात. त्यामुळे अशा कार्यकर्त्याकडून अशी भावना व्यक्त का झाली ? ही भावना प्रातिनिधिक स्वरूपाची आहे का? आणि भाजप या संदर्भात काय कृती करणार? असे प्रश्न चर्चेत आले आहेत.
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नेमलेल्या प्रचार समितीचे सदस्यपद आपल्याला देऊ करण्यात आलेले आहे. पण हे सदस्यपद आपल्याला नको आणि यापुढे आपल्याला न विचारता अशा पद्धतीने कोणतेही पद देण्यात येऊन आपला अवमान केला जाऊ नये", अशा आशयाचा मजकूर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात लिहिला आणि एकच खळबळ माजली.
गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. ज्यांना मंत्रिपद मिळाले किंवा ज्यांना खासदारकी मिळाली अशांमध्येही बाहेरून आलेल्या नेत्यांची संख्या जास्त आहे. याबद्दल पक्षात अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. किरीट सोमय्या यांच्यासारखे जुनेजाणते पक्षाचे नेते आपल्या पत्रात वारंवार असा उल्लेख करताना दिसतात की, मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बोलत आहे. गेल्या काही वर्षात आपण पक्षासाठी बरेच काम करून सुद्धा आजच्या घटकेला आपण केवळ सामान्य कार्यकर्ता आहोत हे सोमय्या यांना या पत्रातून दाखवून द्यायचे आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाने बाहेरून आलेल्या अनेकांना खासदारकी विशेषतः राज्यसभा सदस्यत्व दिले असताना आपल्याला मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी सुद्धा दिली गेली नाही आणि त्यानंतर राज्यसभा सदस्यत्व सुद्धा दिले गेले नाही याबद्दल सोमय्या यांच्या मनात रागाची भावना आहे हे या पत्रावरून उघड झाले आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपल्याला न विचारताच आपल्याला एका प्रचार समितीचे सामान्य सदस्य म्हणून समितीमध्ये घेऊन विजय महत्त्वाचा असतो. सत्ता असेल तरच अनेक गोष्टी करता येतात. विकासाची कामे करता येतात आणि पक्षही वाढवता येतो. त्यामुळे सध्या आम्ही तडजोड म्हणून हा मार्ग स्वीकारलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांची आम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यांनी काही काळ धीर ठेवावा. लांबच्या टप्प्यात त्यांच्यासाठी चांगलेच काहीतरी घडेल', अशा पद्धतीची प्रतिक्रिया राज्यातील एका ज्येष्ठ भाजप नेत्याने व्यक्त केली. काही म्हटले तरी भाजपसमोर सध्या हे एक आव्हान उभे आहे. किरीट सोमय्या यांची भूमिका गेल्या काही वर्षांमध्ये टाकले, ही गोष्ट सोमय्या यांच्या मनाला लागलेली दिसते. आपण जरी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असलो तरी पक्षाने आपल्याला गृहीत धरून चालू नये अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे हे उघड आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की पक्षातील इतर अनेकांच्या सुद्धा मनात अशीच भावना आहे की काय? आणि भीतीमुळे ते त्याबद्दल काही बोलत नाहीत, अशी स्थिती आहे की काय ? महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षांमध्ये विभागणी झाली असल्यामुळे, आता विधानसभेच्या रिंगणामध्ये सात-आठ पक्ष उतरले आहेत. अशा परिस्थितीत काही प्रमाणात तडजोड करावी लागते. बाहेरून आलेले नेते हे जिंकून येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना पदे द्यावी लागतात, असे मत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील आणि केंद्रातील नेते पत्रकारांशी खासगीत बोलताना व्यक्त करतात. 'आम्हालाही आमच्या जुन्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांना पदे द्यायची आहेत, पण सध्याच्या राजकारणात ते कशा पद्धतीने करता येईल याबद्दल अनेक प्रश्न आहेत. शेवटी निवडणुकीत खूप आक्रमक राहिली, भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्तेत असताना विरोधी पक्षातील ज्या ज्या नेत्यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा संशय होता, अशा अनेक नेत्यांच्या प्रकरणांची चौकशी, तपास वगैरे करण्याचे काम सोमय्या यांना भाजपच्या नेत्यांनी दिले. किरीट सोमय्या यांनी ते काम अत्यंत हिरिरीने पार पाडले आणि नंतर यापैकी अनेक नेत्यांवर कारवाई सुरू झाल्यानंतर सोमय्या यांनी त्याची मांडणी मीडियासमोरही केली. केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेतेच नव्हे, तर खुद्द ठाकरे परिवारासंदर्भात सुद्धा आणि त्यांच्या जवळच्या असलेल्या काही नेत्यांच्या संदर्भात सुद्धा अनेक प्रकरणे किरीट सोमय्या यांनी मीडियासमोर आणली. नंतर या प्रकरणांमध्ये सरकारी एजन्सींमार्फत चौकशा सुरू झाल्या. तसेच काही प्रकरणांमध्ये कोर्टातील कारवाई सुद्धा सुरू झाली. पण नंतरच्या काळात यापैकी अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या सोबत आले आणि त्यांच्यावरील कारवाई थंड तर झालीच, पण त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये किंवा त्या पक्षाशी जवळीक असलेल्या मित्र पक्षांमध्ये पदे देण्यात आली. इतकेच नव्हे, तर काहींना मंत्रिपदेही देण्यात आली.
या गोष्टीबद्दलची एक निराशा आणि एक प्रकारचा राग हा किरीट सोमय्या यांच्या मनात आहे ही गोष्ट परवा त्यांनी लिहिलेल्या पत्रातून उघड झाली. अशाच प्रकारची रागाची भावना ही अनेक नेत्यांमध्ये आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे निराशा व्यक्त करण्यास सुरुवात केलेली दिसते आहे. हर्षवर्धन पाटील आता माध्यमांसमोर म्हणत आहेत की, '२०१९ मध्ये मी भारतीय जनता पक्षात आलो. तेव्हापासून मला कुठलेच पद मिळालेले नाही. प्रत्येक वेळी लोकसभा निवडणुकीसाठी मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना काम करण्यास सांगितले जाते. ते आम्ही हिरिरीने करतो. पण त्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक येते तेव्हा आमच्याकडे कोणी बघतच नाही. आम्हाला काही उमेदवारी दिली जातच नाही.' त्यांच्या या विधानामुळे आता हर्षवर्धन पाटील बंड करतील की काय अशी चर्चा पुणे जिल्ह्यात आहे. हीच भावना भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे. भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी यांनाही पक्षाने कोणतेही पद दिले नाही आणि वीस वर्षापेक्षा अधिक काळ काम केल्यानंतरही त्यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व सुद्धा देण्यात आले नाही, याबद्दल त्यांच्या परिवारातील काहीजणांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली असल्याची घटना घडली होती. प्रत्येक जिल्ह्यात जुन्याजाणत्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात अशा पद्धतीची भावना आहे की, आम्ही अनेक वर्षे काम करत असूनही बाहेरून आलेल्या काही नेत्यांना ऐनवेळी पदे दिली जातात. या सगळ्या विषयात आता पक्ष काय भूमिका घेणार आणि ही समस्या कशी सोडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
rohite787@gmail.com