चलो थोडा फिल्मी हो जाए !

सध्याचे राजकारण जर हिंदी चित्रपटात दाखवायचे ठरवले तर कोणत्या गाण्यांचा कुठे, कसा उपयोग केला जाईल ते दाखविण्याचा हा एक हलका फुलका प्रयत्न
चलो थोडा फिल्मी हो जाए !

हिंदी चित्रपट आणि त्यातील गाणी (काही प्रेक्षणीय तर काही श्रवणीय!) हा जवळपास प्रत्येकाचा ‘वीक पॉइंट’ असतो. (ज्याचा आनंद घेण्यासाठी वीकेण्डची वाट पाहावी लागत नाही. त्याला ‘वीक पॉइंट’ म्हणत असावे का? काहींना आपल्या ‘वीक पॉइंट’ची गॅलरीत उभं राहून वाट पाहावी लागते, असं म्हणतात. असो.) समजा, आपले (आपले कसले, आपण निवडून दिलेल्या आणि निवडूनसुद्धा न दिलेल्या राजकारण्यांचे!) सध्याचे राजकारण जर हिंदी चित्रपटात दाखवायचे ठरवले तर कोणत्या गाण्यांचा कुठे, कसा उपयोग केला जाईल ते दाखविण्याचा हा एक हलका फुलका प्रयत्न.१) संध्याकाळची कातरवेळ आहे (आयुष्य किंवा राजकारण किंवा दोन्ही एकदम संपत आले की, ही कातरवेळ जरा जास्तच ‘कातर’ होत जाते, असं म्हणतात. खात्री करून घेण्यासाठी एकदा ‘बारामती - बांद्रा’ दौरा करावा म्हणतो. असो. आपल्याला तर बुवा संध्याकाळची कातरवेळ म्हटली की, फक्त १९६९ साली आलेल्या ‘खामोशी’तलं किशोरदांनी गायलेलं आणि राजेश खन्ना, वहिदावर चित्रित केलेलं, ‘वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब हैं। वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब हैं।’ हे गाणंच आठवतं.). मा. मु. (इथे मा.चा अर्थ माजी घ्यावा.) उधोजीराजे आपल्या दिवाणखान्यात डबडबलेल्या डोळ्यांनी बसलेले आहेत. समोरच्या हस्तिदंती मेजावर एका बाजूला ठाणेकर मा. मु. एकनाथभाईंची तर दुसऱ्या बाजूला उ. मु. देवानाना नागपूरकरांची तसबीर ठेवलेली आहे (आठवा, १९६६ साली आलेला सुनील दत्त, साधनाचा ‘मेरा साया’. सुनील दत्त कसा ‘गेलेल्या’ साधनाच्या तसबिरीसमोर डबडबलेल्या डोळ्यांनी बसलेला असतो!). मा. मु. उधोजीराजे पाणावलेल्या डोळ्यांनी ठाणेकर मा. मु. एकनाथभाईंच्या तसबिरीकडे पाहत आहेत. पार्श्वभूमीवर लतादीदींचं गाणं सुरू आहे.‘अजीब दास्तां हैं ये, कहाँ शुरू कहाँ खतम

ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हमये रोशनी के साथ क्यों, धुआं उठा चिराग से

ये ख़्वाब देखती हूँ मैं की जग पड़ी हूँ ख़्वाब से

मुबारकें तुम्हें की तुम किसी के नूर हो गए

किसी के इतने पास हो की हमसे दूर हो गएकिसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे

ये शाम जब भी आएगी, तुम हमको याद आओगे’गाणं संपल्यावर मा. मु.उधोजीराजेंची नजर शेजारी ठेवलेल्या उ. मु. देवानाना नागपूरकरांच्या तसबिरीकडे जाते. त्यांचे पाणावलेले डोळे कोरडेठाक पडून लालबुंद होतात. पार्श्वभूमीवर मोहम्मद रफीचं गाणं वाजू लागतं.मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसेमुझे ग़म देनेवाले तू ख़ुशी को तरसेतू फूल बने पतझड़ का तुझपे बहार न आये कभीमेरी ही तरह तू तड़पे तुझको करार न आये कभीतुझको करार न आये कभी जीये तू इस तरह के जिंदगी को तरसेमेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसेतेरे गुलशन से ज्यादा वीरान कोई विराना न होइस दुनिया में कोई तेरा अपना तो क्या बेगाना न होकिसी का प्यार क्या तू बेरुखी को तरसे

२) ठाणेकर मा. मु. एकनाथभाई आपल्या कार्यालयात बसले आहेत. शिपायाने मा. मु. उधोजीराजेंची तसबीर नुकतीच भिंतीवरून उतरवून एका कोपऱ्यात ठेवली आहे आणि तिच्या जागेवर उ. मु. देवानानांची तसबीर लावलेली आहे.

ठाणेकर मा. मु. एकनाथभाई खाली उतरवून कोपऱ्यात ठेवलेल्या उधोजीराजेंच्या तसबिरीकडे बघून क्षणभर भावूक होतात. पार्श्वभूमीवर किशोरदांच गाणं वाजू लागतं.हम बेवफा हरगिज़ न थेपर हम वफ़ा कर न सकेतुमने जो देखा-सुना सच था मगरकितना था सच ये किसको पताजाने तुम्हे मैं न कोई धोखा दियाजाने तुम्हे कोई धोखा हुआइस प्यार में सच-झूठ कातुम फैसला कर ना सकेगाणं संपल्यावर ठाणेकर मा. मु. एकनाथभाईंची नजर नुकत्याच भिंतीवर लावलेल्या उ. मु. देवानानांच्या तसबिरीकडे जाते.

पार्श्वभूमीवर मुकेशचं गाणं वाजू लागतं जो तुमको हो पसंद, वो ही बात कहेंगेतुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगेदेते ना आप साथ, तो मर जाते हम कभी केपूरे हुए हैं आप से अरमान ज़िन्दगी केहम ज़िन्दगी को आपकी सौगात कहेंगेतुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगेजो तुमको हो पसंद, वो ही बात कहेंगेचाहेंगे, निभाएँगे, सराहेंगे आप ही कोआँखों में नम हैं जब तक, देखेंगे आप ही कोअपनी ज़ुबाँ से आपके जज़्बात कहेंगेतुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगेजो तुमको हो पसंद, वो ही बात कहेंगे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in