चलो थोडा फिल्मी हो जाए

डोळ्यासमोर ‘सहाव्या मजल्यावरची खुर्ची’ तरळते आहे. पार्श्वभूमीवर रफीचं गाणं वाजतंय.
चलो थोडा फिल्मी हो जाए

मागच्या लेखात आपण दोन मा.मुं.ची (एक माजी मुख्यमंत्री तर दुसरे माननीय मुख्यमंत्री) मनोदशा गाण्यांच्या माध्यमातून पाहिली. आता इतर पात्रे पाहूयात. -

१) संध्याकाळची कातरवेळ आहे. उ. मु. (कोणी उपमुख्यमंत्री समजा, कोणी उर्वरित मुख्यमंत्री समजा.) ‘सागर’च्या लॉनवर खिन्न मनाने डोळे मिटून बसलेले आहेत. समोरच्या टिपॉयवर (त्यांच्या संस्कृतीला शोभणारा; पण संध्याकाळच्या कातरवेळी न शोभणारा) वाफाळता चहा आणि खारी ठेवलेली आहे. त्यांच्या डोळ्यासमोर ‘सहाव्या मजल्यावरची खुर्ची’ तरळते आहे. पार्श्वभूमीवर रफीचं गाणं वाजतंय.

क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में

चाहा क्या, क्या मिला, बेवफा तेरे प्यार में

तेरे मेरे दिल के बीच अब तो, सदियों के फासले हैं

यकीन होगा किसे की हम तुम

इक राह संग चले हैं, होना हैं और क्या

बेवफा - - - तेरे प्यार में

तेवढ्यात, ‘साहेब, माणसं धुवायची ‘सागर लाँड्री’ इथंच हाय का? असं कोणीतरी इचारतयं,’ अशी वर्दी देत शिपाई येतो आणि देवानानांची तंद्री भंग पावते.

२) वेळ - खरं तर कोणावर येऊ नये अशी; पण लौकिकार्थाने सकाळची ९ वाजेची.

स्थळ - एक ‘आठ बाय आठ’ची खोली.

एक वाचाळ संपादक त्या खोलीत पिंजऱ्यातली वाघाप्रमाणे अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. बाहेर आपले नेहमीचे ‘दांडकेधारी’ दिसतात का याचा वेध त्यांचे डोळे चश्म्याच्या फ्रेमच्या वरून घेत आहेत. एका हाताने त्यांनी आपलंच तोंड दाबून धरलं आहे. ‘दांडकेधारकां’च्या समोर उधळण्यासाठी शब्दांनी त्यांच्या तोंडात सवयीप्रमाणे गर्दी केलेली आहे; पण समोर कोणीच नसल्यामुळे त्यांनी स्वतःचेच तोंड दाबून शब्दांना रोखून धरले आहे. बघता बघता त्यांची कोणी येण्याची आशा मावळते आणि ते खिन्न मनाने डोळे मिटून, भिंतीला टेकून बसतात. पार्श्वभूमीवर पंकज उधासचा आवाज उमटू लागतो.

दिवारों से मिलकर रोना अच्छा लगता हैं

हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता हैं

दुनियाभर की यादें हम से मिलने आती हैं

शाम ढले इस सुने घर में मेला लगता हैं

हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता हैं.

हळूहळू कोठडीतला अंधार गडद होत जातो.

३) संध्याकाळची कातरवेळ आहे. चुलतराजे ‘शिवतीर्थ’च्या आपल्या कक्षात खिन्न मनाने बसले आहेत. कक्षातील मंद दिव्यांमुळे समोरच्या टिपॉयवर नेमके कोणते पेय ठेवले असावे, याचा अंदाज येत नाहीये. चुलतराजे हातातला पेला तोंडाला लावतात. त्यांची नजर शून्यात हरवली आहे. पार्श्वभूमीवर मुकेशचं गाणं वाजतंय.

रास्ते का पत्थर, किस्मत ने मुझे बना दिया

जो रास्ते से गुज़रा, एक ठोकर लगा गया

कितने घाव लगे हैं, ये मत पूछो मेरे दिल पे

कितनी ठोकर खाईना पहुंचा

फिर भी मज़िल पे कोई आगे फेंक गया

तो कोई पीछे हटा गया

पहले क्या कर पाया

क्या इसके बाद करूँगा मैं

जा री जा ऐ दुनिया क्या

तुझको याद करूँगा मैं

दो दिन तेरी महफ़िल में

क्या आया क्या गया.

हळूहळू कक्षातला अंधार गडद होत जातो आणि चुलतराजे खुर्चीवरच निद्रिस्त होतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in