माझी आई

आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या आईच्या विविध गुणांचा उल्लेख त्यांनी या ब्लॉगमध्ये केला आहे
माझी आई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई शंभराव्या वर्षात पदार्पण करत असताना त्यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. आपल्या आईसोबत घालवलेल्या बालपणीच्या काही खास क्षणांना त्यांनी यात उजाळा दिला आहे. ते मोठे होत असताना आपल्या आईने केलेल्या अनेक त्यागांची आठवण त्यांनी करून दिली. तसेच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या आईच्या विविध गुणांचा उल्लेख त्यांनी या ब्लॉगमध्ये केला आहे.

माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य आहे. अगदी सर्व आईप्रमाणे... लहान वयातच तिने आपली आई गमावली. तिला माझ्या आजीचा चेहरा किंवा तिच्या कुशीतली मायेची ऊबही आठवत नाही. तिने तिचे संपूर्ण बालपण आईशिवाय घालवले. मातीच्या भिंती आणि छतावर मातीची कौले असलेल्या वडनगरमधील छोट्याशा घरात ती आई-वडील आणि आपल्या भावंडांसोबत राहत होती. असंख्य दैनंदिन संकटांना तोंड देत आईने त्यावर यशस्वी मात केली.

आईने केवळ घरातील सर्व कामे एकटीनेच केली नाहीत, तर घरच्या तुटपुंज्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठीही काम केले. घरखर्च भागवण्यासाठी ती काही घरात धुणीभांडी करायची आणि चरखा कातण्यासाठीही वेळ काढायची. पावसात आमचे छत गळायचे आणि घरभर पाणी व्हायचे. पावसाचे पाणी जमा करण्यासाठी आई गळत असलेल्या ठिकाणी बादल्या आणि भांडी ठेवायची. या प्रतिकूल परिस्थितीतही आई हे लवचिकतेचे प्रतीक भासायचे. आईला इतर लोकांच्या आनंदात आनंद मिळत असे आणि ती खूप मोठ्या मनाची होती. वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला-अब्बासला

logo
marathi.freepressjournal.in