प्रेमाच्या शहरात ऑलिम्पिकची रंगत

क्रीडा चाहत्यांना २६ जुलै रोजी सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने वेगवेगळ्या खेळांमध्ये देश कशी कामगिरी करणार असा सवाल विचारला जात आहे.
प्रेमाच्या शहरात ऑलिम्पिकची रंगत
X
Published on

- अमृता वाडीकर

दखल

क्रीडा चाहत्यांना २६ जुलै रोजी सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे वेध लागले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने वेगवेगळ्या खेळांमध्ये देश कशी कामगिरी करणार असा सवाल विचारला जात आहे. ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा महाकुंभ, विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित क्रीडास्पर्धा. अवघ्या जगतातून एकापेक्षा एक सरस खेळाडू या स्पर्धेमध्ये कौशल्य दाखवणार आहेत. त्या निमित्ताने घेतलेला वेध.

पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असल्याने जगभरातल्या क्रीडा चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. पॅरिसमध्ये तिरंदाजी ही भारताची सलामीची स्पर्धा असेल. २६ जुलै रोजी उद‌्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी ती सुरू होईल. तिरंदाजीमध्ये पाच पदक स्पर्धा होणार असून सर्वांमध्ये भारत आपली दावेदारी मांडणार आहे. भारताच्या ऑलिम्पिक कुस्ती दलात पुरुषांपेक्षा महिला कुस्तीपटूंची संख्या अधिक असेल, अशी ही पहिलीच वेळ असेल. पाच महिला कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. पुरुष गटात अमन सेहरावत हा एकमेव कुस्तीपटू आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून भारताने कुस्ती या खेळात प्रत्येक वेळी पदके जिंकली आहेत. या वेळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व पैलवानांकडून पदकांची अपेक्षा आहे. पहिल्यांदाच भारतीय कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेल, अशी अपेक्षा आहे.

भारतीय कुस्तीपटूंनी आतापर्यंत १९ वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. त्यात त्यांनी एकूण सात पदके (दोन रौप्य, पाच कांस्य) जिंकली आहेत. देशासाठी कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांनी जिंकले. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात त्यांनी हे पदक जिंकले होते.

ऑस्ट्रियन नाविक लारा आणि तिचा लेस्बियन पार्टनर फुटबॉलपटू ली यांच्यासाठी हे ऑलिम्पिक एकत्र राहण्याची संधी आहे. ली हिचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. दुसरीकडे, जर्मन नाविक लारा दोनदा ऑलिम्पिक खेळला आहे. भारताचा अनुभवी तरुणदीप चौथे ऑलिम्पिक खेळणार असून त्याला या वेळी रिकाम्या हाताने परतणे आवडणार नाही. महिला संघात दीपिकाकुमारी, भजन कौर आणि अंकिता भकट यांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणेच दीपिका पुन्हा एकदा वैयक्तिक स्पर्धेत पदकाची दावेदार असेल. दीपिका गेल्या तीन वेळा चुकली असेल. पण, आई झाल्यानंतर या वेळी तिने आत्मविश्वासाने पुनरागमन करणे कौतुकास्पद आहे. भारताच्या धनुर्विद्येच्या अपयशाचे प्रमुख कारण म्हणून आपण बरेचदा वाहत्या वाऱ्याला दोष देतो. आपल्या तिरंदाजांना जोरदार वाऱ्यात खेळण्याची सवय नाही, तर युरोपियन तिरंदाजांना वाऱ्याच्या वेगाचा फारसा फरक पडत नाही. सध्या फ्रान्समध्ये हवामान चांगले आहे. त्यामुळे ‌‘विंड फॅक्टर‌’चा प्रभाव नसावा, असे वाटते. भारतीय तिरंदाजांनी गेल्या दोन वर्षांमध्ये उत्कृष्ट निकाल नोंदवले आहेत. ऑलिम्पिकमध्येही हा ट्रेंड कायम राहील अशी आशा आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगातील दहा हजारांहून अधिक खेळाडू पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि निखत झरीन या जागतिक दर्जाच्या बॉक्सर्सकडूनही भारताला पदकाची आशा आहे. या वेळी भारतीय संघात ११३ खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या वेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकीचा सुवर्ण इतिहास आहे. भारताला १९२८ मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळण्याची संधी मिळाली आणि ध्यानचंद यांच्या १४ गोलच्या जोरावर संघाने पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले. इथून ऑलिम्पिकमध्ये हॉकी इंडियाची सुवर्णकथा सुरू होते. त्यानंतर १९३२, १९३६, १९४८, १९५२ आणि १९५६ मध्ये सुवर्णपदके जिंकली. भारताने १९६४ आणि १९८० मध्येही सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर संघाला हॉकीमध्ये सुवर्ण जिंकता आलेले नाही. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून संघाने हॉकीमध्ये देशाचे चैतन्य जागृत केले आणि सुवर्णपदकाची शक्यता वाढवली आहे.

हॉकीमधला भारताचा अलीकडचा फॉर्म फारसा चांगला नसतानाही या संघाकडून ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. याला केवळ खेळाडूंचे कठोर प्रशिक्षण, परिश्रम आणि उत्साहच कारणीभूत नाही तर हा संघ आणखी एकसंघ होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानचा ५-१ असा पराभव करून भारताने हे सिद्ध केले. त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीसारख्या बलाढ्य संघाचाही पराभव केला होता. या वेळी संघाला वरुणकुमारची उणीव भासणार आहे, पण संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे. गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि मिडफिल्डर मनप्रीत सिंग चौथे ऑलिम्पिक खेळण्यासाठी सज्ज आहेत, तर बचावपटू जर्मनप्रीत सिंग, फॉरवर्ड अभिषेक हे पूर्णपणे नवीन खेळाडू आहेत. संघाचे हे संयोजन मैदानी कामगिरीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. भारताच्या गटामध्ये बेल्जियम, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ हे सोपे प्रतिस्पर्धी नसले, तरी न्यूझीलंड, आयर्लंड आणि अर्जेंटिनासारख्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध भारत अनुकूल निकालाची अपेक्षा करू शकतो. विशेष बाब म्हणजे भारताला पहिले तीन सामने न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि आयर्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. अपेक्षेप्रमाणे कामगिरी करून भारत हे सामने जिंकू शकतो. या सामन्यांमधील तीन विजय भारताला पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यानंतर ते बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित दोन सामने उच्च मनोबलाने खेळू शकतात.

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून भारताने प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदके जिंकली आहेत आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंसमोर ही परंपरा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असेल. सलग चार ऑलिम्पिकमधील यशानंतर कुस्ती हा भारताचा प्रमुख खेळ बनला.

सुशीलकुमारने २००८मध्ये कांस्यपदक जिंकून भारतातील कुस्तीचे परिदृश्य बदलले. त्याने चार वर्षांनंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले, तर योगेश्वर दत्तने कांस्यपदक जिंकले. साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिक गेम्स २०१६ मध्ये कांस्यपदक जिंकून हा ट्रेंड सुरू ठेवला, तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहियाने रौप्यपदक आणि बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले. परंतु, हा खेळ दररोज नवीन उंची गाठत होता, तेव्हा भारतीय कुस्ती महासंघाच्या तत्कालीन प्रमुखांच्या विरोधात देशातील अव्वल कुस्तीपटूंनी केलेल्या निषेधामुळे त्याच्या प्रगतीला मोठा धक्का बसला. भारतातर्फे या खेळासाठी फक्त एक पुरुष आणि पाच महिला खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले. ते काय करतात, ते आता पहायचे.

logo
marathi.freepressjournal.in