गाथा पर्यावरणाची; प्रदूषण निर्मूलनाची सुरुवात घरापासून...

सामान्यजनांनी दक्षता बाळगण्याचं ठरवल्यास घरातूनच एका सामाजिक क्रांतीला सुरुवात होईल.
गाथा पर्यावरणाची; प्रदूषण निर्मूलनाची सुरुवात घरापासून...

(लेखक : शेखर लोखंडे)

उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे. शिवाय आपल्या देशातले सुमारे ७० टक्के पाणी दूषित आहे. पाण्याच्या वापरासंदर्भातील या समस्येची सुरुवात घरापासूनच होते. फरशी, भांडी, टॉयलेट आदींच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणारी घातक रसायने पाण्यात मिसळून जमिनीचेही प्रदूषणही होते. सामान्यजनांनी दक्षता बाळगण्याचं ठरवल्यास घरातूनच एका सामाजिक क्रांतीला सुरुवात होईल.

जगात सर्वत्रच पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, भूगर्भातील पाण्याचे साठे मात्र कमी कमी होऊ लागले आहेत. भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे. दक्षिण आफ्रिकेतले केप टाउन हे शहर भूगर्भातील पाणीसाठा संपलेले जगातले पहिले शहर ठरले. जगात इतर अनेक शहरांमध्येही पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. भारतात चेन्नईमध्ये भूगर्भातील पाण्याचे साठे कमी होऊ लागले आहेत. जगात सर्वत्रच भूगर्भातील पाणी उपसण्याचा दर पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याच्या दरापेक्षा वाढला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भूगर्भातील पाण्याचे साठे संपुष्टात आल्यास नवल वाटायला नको. ‘डाऊन टू अर्थ’ या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, पाण्याच्या कमतरतेबाबत भारताचा जगात तेरावा क‘मांक लागतो. पण लोकसं‘येचा आणि पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करता आपण कधीही पहिल्या क‘मांकावर पोहोचू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे सध्या तरी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून जिरवणे आणि पाण्याचा वापर कमी करणे हाच उपाय दिसतो. दुर्दैवाने आपल्याकडे या समस्येकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. तज्ज्ञजन एका मर्यादेपलिकडे बोलत नाहीतच पण होणारे नुकसान उमगूनही सामान्यजन गप्प राहतात. ‘कोण करणार या उठाठेवी’ अशी काहीशी वृत्ती असल्यामुळे प्रत्येकाच्या घराशी, कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा असूनही या विषयावर सांगोपांग चर्चा होत नाही. वास्तवात मात्र या विषयाकडे समाजाचे लक्ष वेधणे आवश्यक असून घरात पाणी वापरताना, भांडी-कपडे धुताना काळजी बाळगण्यापासून विचार करणं आवश्यक आहे.

तसे न झाल्यास नजिकच्या भविष्यात आपल्यालाच परिणाम भोगावे लागणार आहेत. मात्र सामान्यजनांनी दक्षता बाळगण्याचं ठरवल्यास घरातूनच एका सामाजिक क्रांतीला सुरुवात होईल. या विषयाच्या मुळाशी जाण्यापुर्वी पाण्याचे प्रदूषण आपल्या घरापर्यंत कसे आले आहे आणि संशोधक त्यावर कसा उपाय शोधत आहेत, हे तपासून घेणे आवश्यक आहे. ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या अहवालानुसार देशातले जवळ जवळ ७० टक्के पाणी दूषित (कन्टॅमिनेटेड) आहे. पाण्याच्या वापरासंदर्भातील ही आणखी एक दखलपात्र समस्या आहे. तिची सुरुवात घरापासूनच होते. फरशी, भांडी, टॉयलेट आदींच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणारी घातक रसायने पाण्यात मिसळून आपण सांडपाण्याद्वारे ड्रेनेज सिस्टीममध्ये सोडतो. त्यामुळे जमिनीचेही प्रदूषण होते. ‘बायजुज’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ‘एन्व्हायर्न्मेंटल परफॉर्मन्स इंडेक्स’मध्ये १८० देशांमध्ये भारताचा १८० वा क्रमांक लागतो. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण वापरत असलेल्या साबण, डिटर्जंट पावडर आणि इतर उत्पादनांचा भरपूर फेस होतो. हा फेस धुण्यासाठी भरपूर पाणी वापरावे लागते. कपडे, भांडी किंवा त्वचा स्वच्छ होण्यासाठी भरपूर फेस असायला हवा, हा गैरसमज आहे. विदेशी कंपन्यांनी हा गैरसमज आपल्या मनात पक्का करून ठेवला आहे. परंतु, फेस न करताही आपल्याला स्वच्छता करता येते. आपण वापरत असलेले उटणे किंवा मुलतानी माती ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळे फेस कमी असेल तर पाण्याची नक्कीच बचत होईल.

या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आम्ही काही प्रयोग केले. ते प्रयोग तात्पुरते यशस्वी होऊन उपयोग नव्हता, तर ‘सस्टेनेबिलिटी’चाही विचार करायचा होता. यावर उपाय म्हणजे स्वच्छतेसाठी ऑरगॅनिक केमिस्ट्रीची रसायने (ऑरगॅनिक केमिकल्स) वापरायला हवीत, असे आमच्या लक्षात आले. जमिनीच्या प्रदूषणात हातभार नसल्यामुळे ही रसायने ‘इको फ्रेंडली’ ठरतात शिवाय इतर घातक रसायनांप्रमाणे ऑरगॅनिक केमिकल्समुळे वापरणार्‍यांच्या त्वचेवर घातक परिणाम होत नाहीत. अशा उत्पादनाची फॅक्टरी ‘झिरो वेस्ट’ तत्त्वावर चालवली जावी यासाठी आग‘ही असणे गरजेचे आहे. त्यामुळे फॅक्टरीत वापरलेला कच्चा माल पूर्णपणे उत्पादनांमध्ये परिवर्तीत केला जातो. कंपनीच्या ड्रेनेजलाईनमधून कोणत्याही उत्पादनाचा अंश बाहेर जात नाही. याशिवाय सर्व कच्चा माल ऑरगॅनिक केमिस्ट्रीवर आधारित असल्यामुळे घातक धुराची निर्मितीही होत नाही. ही सर्व उत्पादने वापरताना पाण्याची किमान ५० टक्के बचत होते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी ही उत्पादने वापरल्यास होणारी पाण्याची बचत मोठी असू शकेल. शिवाय ही सर्व उत्पादनं ‘सुपर कॉन्सन्ट्रेट’ स्वरूपात तयार केली असल्याने अत्यंत अल्प प्रमाणात वापरूनही योग्य रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर ही सर्व उत्पादने ‘मल्टिटास्किंग’ आहेत. म्हणजे एका उत्पादनाची अनेक ऍप्लिकेशन्स असू शकतात. पाणीप्रश्‍न किंवा पर्यावरणाच्या संदर्भात काम करणार्‍या काही संस्थांनी या उत्पादनांच्या चाचण्या घेऊन सत्यता पडताळून पाहिली आहे.

या सर्व उत्पादनांसाठी लागणार्‍या पाण्यासंदर्भातही आमचे वेगळे प्रयोग सुरू आहेत. या उत्पादनांच्या उत्पादन प्रकि‘येत भूगर्भातले किंवा औद्योगिक महामंडळाद्वारे पुरवले जाणारे पाणी न वापरता समुद्राच्या पाण्याचा वापर करता येईल का, याबाबतही आमचे संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. ते यशस्वी झाल्यावर पिण्यायोग्य पाण्याचा वापर आणखी कमी होईल आणि पर्यावरणरक्षणात आणखी हातभार लागू शकेल. हे प्रयोग नक्कीच यशस्वी होतील याची आम्हाला खात्री आहे. हा सगळा विचार करण्यामागे आणखी एक महत्वाचे कारणही होते. अनेक महिलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. इतरांच्या त्वचेसाठी अगदी सुरक्षित असलेल्या साबणानेही अशा महिलांच्या त्वचेला हानी पोहोचत असते. हे लक्षात घेऊन आम्ही एक ‘लिक्विड सोप’ तयार केला. त्यासाठीही ऑरगॅनिक केमिकल्सचाच वापर केला. या ‘लिक्विड सोप’ची चाचणी घेतली असता त्वचा संवेदनशील असूनही कोणताही त्रास झाला नसल्याचे लक्षात आले; उलट, ती अधिक मऊ झाली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आम्ही अधिकाधिक पर्यावरणपूरक आणि मानवी त्वचेसाठी सुरक्षित अशा उत्पादनांवर काम सुरू केले आणि हे काम अव्याहतपणे सुरूच आहे.

स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांची देशातली बाजारपेठ २० अब्ज अमेरिकन डॉलर्सहून मोठी आहे. यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बस्तान बसवलं आहे. देशातील अनेक कंपन्यांनीही या बाजारपेठेत आपापला वाटा जपला आहे. शिवाय स्थानिक पातळीवर उत्पादने तयार करून तिथेच विकणार्‍या असं‘य कंपन्या अनऑर्गनाईज्ड क्षेत्रात आहेत. या क्षेत्राचा बारीक अभ्यास केल्यावर पर्यावरणपूरक आणि पाणी वाचवणार्‍या उत्पादनांची अजूनही मोठी गरज असल्याचं आढळून आलं. आखाती देश, काही आफि‘कन देश आणि इतर बर्‍याच देशांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने या उत्पादनांना मोठी मागणी असू शकते. शिवाय जगातल्या अनेक देशांमध्ये पर्यावरण आणि पाण्याच्या बचतीबद्दल पुरेशी जनजागृती झाली आहे. या देशांमध्येही अशी उत्पादने विकली जाऊ शकतात. पण सामान्य माणसाला त्याच्या खिशाला परवडतील अशी उत्पादनं मिळायला हवीत. बाजारात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये काम करणार्‍या कंपन्या फारच कमी आहेत. अनेकदा त्यांची उत्पादनं खूपच महाग असतात. त्यामुळे ती सर्वसामन्यांना परवडत नाहीत. पण अधिकाधिक लोकांनी अशा उत्पादनांचा वापर केल्यास अधिकाधिक पाणी वाचेल आणि पर्यावरण सुरक्षित राहील. म्हणून ही उत्पादनं सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरांमध्ये उपलब्ध करता यावीत यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in