पुरुषांमधील प्रजननक्षमता निर्देशांकात लक्षणीय सुधारणा ; अँटिऑक्सिडंट्स आणि सुक्ष्मपोषकांचा मिश्रणाचा परिणाम

मेयर व्हिटाबायोटिक्स ह्या भारतातील प्रमुख न्यूट्रास्युटिकल कंपनीतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात आढळले
पुरुषांमधील प्रजननक्षमता निर्देशांकात लक्षणीय सुधारणा ; अँटिऑक्सिडंट्स आणि सुक्ष्मपोषकांचा मिश्रणाचा परिणाम

मेयर व्हिटाबायोटिक्सने भारतातील १० वेगवेगळ्या ठिकाणी ‘इम्पॅक्ट ऑफ अँटिऑक्सिडंट्स इन इम्प्रूव्हिंग सिमेन पॅरामीटर्स लाइक काउंट मोटिलिटी अँड डीएनए फ्रॅग्मेंटेशन इन सब फर्टाइल मेल्स : अ रैंडमाइंड, डबल ब्लाइंड, प्लासिबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल’ या शीर्षकाखाली एक वैद्यकीयअभ्यास केला. त्यानुसार अँटिऑक्सिडंट सुक्ष्मपोषके आणि जीवनसत्वांच्या मिश्रणामुळे तीव्र स्वरूपाचे वंध्यत्व असलेल्या पुरुषांमध्येही प्रजननक्षमतेचा निर्देशांक ७६ टक्क्यांनी सुधारत असल्याचे, मेयर व्हिटाबायोटिक्स ह्या भारतातील प्रमुख न्यूट्रास्युटिकल कंपनीतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात आढळले आहे.

पायाभूत शुक्राणूसंख्या प्रतिमिली ५ दशलक्षांहून कमी असलेल्या भारतीय पुरुषांना विविध जीवनसत्वे, क्षार अत्यावश्यक अमिनो आम्ल, जिनसेंग व लायकोपीन ह्यांचे मिश्रण दिले असता, त्यांची शुक्राणूसंख्या ७५.७६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. वंध्यत्वाचे विविध प्रकार व तीव्रता असलेल्या ३०० भारतीय पुरुषांच्या सहभागातून ३ महिने हा अभ्यास करण्यात आला. भारतात सहसा दुर्लक्षित असलेल्या विविध सुक्ष्मपोषक उपचारांचे प्रोत्साहक परिणाम ह्या अभ्यासात दिसून आले. हा अभ्यास ट्रान्सलेशनल अँड क्लिनिकल फार्माकोलॉजी आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला.

या अभ्यासातील चाचण्यांचे प्रमुख अन्वेषक डॉ. अमीत पत्की सांगतात, “वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांमधील २०-३० टक्के प्रकरणांमध्ये गर्भधारणा न होण्यास पुरुषांतील वंध्यत्व जबाबदार असते. पुरुषांमधील वंध्यत्व हे एक वैद्यकीय आव्हान आहे. ओलिगोस्पर्मिया (शुक्राणूसंख्या कमी असणे), अस्थेनोस्पर्मिया (शुक्राणूंमधील गतिशीलता कमी असणे) आणि टेराटोस्पर्मिया (असामान्य शुक्राणूंचा समूह) या वीर्यातील अपसामान्यतांमुळे बहुतेकदा पुरुषांमध्ये वंध्यत्व असते. शस्त्रक्रियात्मक उपचार व औषधांच्या स्वरूपातील उपचार हे पर्याय पुरुषांमधील वंध्यत्वावर आहेत, पण हे उपचार महागडे, क्लिनिक परिणामकारकतेबाबत अनिश्चित आहेत व त्याचे दुष्परिणाम ही आहेत. पुरुषांमधील प्रजनन क्षमतेचा निर्देशांक उंचावण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर करण्याबाबत क्लिनिशियन्स व संशोधक अधिकाधिक काम करू लागले आहेत. प्रजननक्षमता कमी असलेल्या पुरुषांमध्ये शुक्राणू डीएनएचे विभाजन अधिक प्रमाणात होते. हे प्रमाण सामान्य मूल्याच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक असेल, तर शुक्राणूंचा दर्जा लक्षणीयरित्या खालावतो. या प्रयोगाचे चाचणीचे वेगळेपण म्हणजे यात उपचारापूर्वीच्या व नंतरच्या मूल्यांकनामध्ये डीएफआयचा समावेश एक प्रयोगाचे/ट्रायलचा घटक म्हणून करण्यात आला आहे.”

मेयर व्हिटाबायोटिक्सचे उपाध्यक्ष रोहित शेलाटकर सांगतात, “वंध्यत्व ही जगभरातील गंभीर समस्या आहे. पुरुषांमधील वंध्यत्वामध्ये आहार व अँटिऑक्सिडंट पूरके यांची भूमिका महत्त्वाची आहे, यावर शिक्कामोर्तब यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या सर्वसमावेशक अहवालांमधून झाले आहे. एक सोयीस्कर. कमी खर्चाचा आणि तरीही वैद्यकीयदृष्ट्या परिणामकारक पर्याय वापरला जावा, असे आवाहन, सध्याच्या उपचार पर्यायांना असलेल्या मर्यादांमुळे केले जात आहे. एकंदर वैद्यकीय क्षेत्राचा अँटिऑक्सिडंट उपचारांमधील वाढता रस आणि पद्धतशीर शास्त्रशुद्ध पुराव्याची आवश्यकता यांचा विचार करता दुय्यम प्रजननक्षमता असलेल्या पुरुषांमध्ये अँटिऑक्सिडंट मिश्रणाच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्याच्या हेतूने, सध्याच्या अभ्यासाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.”

चाचणीची वैशिष्ट्ये

* वैद्यकीय चाचणीमागील हेतू, प्रजननक्षमता न्यून असलेल्या पुरुषांमध्ये ओलिगोकेअर फोर्ट प्लसची सुरक्षितता, परिणामकारता व सहनशीलता तपासणे हा होता.

* डॉ. अमीत पत्की ह्यांच्यासोबत डॉ. मोनिका सिंग, डॉ. श्वेता अगरवाल, डॉ. वेणूगोपाल एम. डॉ. शशिकांत उंबरदंड, डॉ. अपूर्वा रेड्डी, डॉ. प्रिया कन्नन, डॉ. श्रीतता गोरथी, डॉ. गौतम खस्तगिर डॉ. अनिता कुलश्रेष्ठ ह्यांनी अन्य ठिकाणी अन्वेषक म्हणून काम केले.

* संशोधनाची अभ्यास उद्दिष्टे पूर्ण करण्यात तसेच त्यातून अमूल्य माहिती प्राप्त करण्यात, या सर्वांचे समर्पण व प्रयत्न ह्यांचे मौल्यवान योगदान लाभले.

* पात्रता निकष पूर्ण करणारे ३०० जण ह्या अभ्यासात सहभागी झाले होते आणि या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष खूपच प्रोत्साहक आहेत.

* ही प्रजननक्षमता कमी असलेल्या पुरुषांची बहुकेंद्री असलेली अशा प्रकारच्या एकमेव चाचण्यांपैकी एक होती. उत्तम वैद्यकीय पद्धती (जीसीपी) आणि सर्व लागू नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून ही चाचणी घेण्यात आली.

मेयर व्हिटाबायोटिक्स

व्हिटाबायोटिक्स लिमिटेड ह्या लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या यूकेच्या क्रमांक एकच्या व्हिटॅमिन कंपनीचा. मेयर व्हिटबायोटिक्स हा एक भाग आहे. कंपनीने आघाडीची औषधनिर्मिती कंपनी म्हणून स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. कंपनीच्या आद्य जीवनसत्वे व क्षार पूरकांची संपूर्ण श्रेणी ११०हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. नवी आरोग्याची काळजी. संशोधन व सर्व वयोगटांसाठी पोषण मुल्ये पुरवणे ह्यांमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठी मेयर व्हिटाबायोटिक्स वचनबद्ध आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in