सुहित जीवन ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद - अतुल झेंडे

सुहित जीवन ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद - अतुल झेंडे

पेण येथील गतिमंद मुलांची शाळा सुहित जीवन ट्रस्ट व नेनेज कराओके स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र पाडव्याच्या दिनानिमित्त जल्लोष 2023

सुहित जीवन ट्रस्ट मध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष मुलांची बौध्दीक आणि शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय आहे. विशेष मुलांनी केलेले कलाविष्कार व त्यांचे कौशल्य वाखाण्याजोगे असून संस्था, पालक व शिक्षकांची मेहनत कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पेण येथे काढले.

पेण येथील गतिमंद मुलांची शाळा सुहित जीवन ट्रस्ट व नेनेज कराओके स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र पाडव्याच्या दिनानिमित्त जल्लोष 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी पेण येथील सुप्रसिद्ध व्हिस्क क्लीनिंग प्रोडक्ट्स या कंपनीचे मालक अरविंद गुरव यांनी सामाजिक बांधीलकी जपत डिशवॉश, फ्लोरक्लीनर, हॅंडवॉश आणि स्क्रबर हि उत्पादने पेण पत्रकार संघाच्या माध्यमातून संस्थेला मोफत दिली. तसेच प्रत्येक महिन्याला मागणी प्रमाणे कंपनी कडुन विनामूल्य देण्याचे पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष विद्यार्थ्यांसह पालकांचे गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, बाळ न्याय मंडळ न्यायाधीश ॲड.भूषण जंजिरकर, डॉ.नीता कदम, सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील, पेण क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, सुनिल पाटील, विजय मोकल, राजेश कांबळे, विनायक पाटील, निलेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in