कौतुकाचे दोन शब्द !

जेव्हा कर्मचाऱ्याला याची खात्री पटते आपले कामं ,त्यासाठी केलेली मेहनत ह्यांची दखल घेतली जाते तेव्हा त्यांना अजून उत्तम कामगिरीसाठी हुरूप येतो
कौतुकाचे दोन शब्द !

राधा टीम लिडर असल्यामुळे कायम तिच्या सर्व संघ सदस्याला प्रोत्साहन देण्यात,त्यांचे कौतुक करण्यासाठी पुढे असायची . प्रत्येक सदस्याचे असणारे खास कौशल्य तिला माहित होते ,सर्वांच्या योगदानामुळे आपल्या संघाचे कामं उत्तम होतयं याची तीला जाणीव होती. तिला माहित होते की प्रशंसा,कौतुकं हे आपल्या संघाला प्रेरणा देण्यासाठी महत्वाचं आहे. प्रत्येकाला आपल्या कामाचे श्रेय ,कौतुक हवे असते त्यामुळे मनाला उभारी येते ,मनोबल वाढतं . आपले कामाचे योगदान योग्य आहे त्याची जाणीव होते . पगार ,जादा आर्थिक मोबदला सर्वाना हवा असतो पण सोने पै सुहागा म्हणजे कौतुकाचे शब्द ! जेव्हा कर्मचाऱ्याला याची खात्री पटते आपले कामं ,त्यासाठी केलेली मेहनत ह्यांची दखल घेतली जाते तेव्हा त्यांना अजून उत्तम कामगिरीसाठी हुरूप येतो , ते कंपनीच्या उद्दिष्टाप्रती आपणहून जबाबदारी घेतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन, प्रेरणा ,कौतुकाचे शब्द हे कायम सकारात्मक प्रभाव देतातं.

आपल्याला गृहीत न धरता आपल्या म्हणण्याकडे, मागण्याकडे लक्ष आहे हे त्यांच्या दृष्टीने खूप सुखावणारे असते. कर्मचारी ,टीम सदस्य यांचे कौतुक केल्याने त्यांचे मनोबल तर नक्कीचं उंचावते पण सहकाऱ्यांसोबत एक छान बॉण्ड तयार होतो . कौतुक केल्याने त्यांच्या कठोर परिश्रमाची ,त्यांच्या योगदानाची कदर होतेय हे त्यांना समजतं . कर्मचारी ,संघ सदस्य कौतुकामुळे आपसुक कामासाठी आनंददायी वातावरण तयार होते. बाकी जणांना पण त्यामुळे दर्जेदार काम करण्याची प्रेरणा मिळते . जर कर्मचारी समाधानी ,आनंदी असतील तर कंपनी कोणी सोडून जाणार नाही . कर्मचारी उलाढाल दर (employee turnover rate ) कमी असेल .आनंदी कर्मचारी आनंदी ग्राहक ! यातच सर्व आलं. बऱ्याच जणांना ओरडायला, चुका दाखवण्यात ,पुढच्याला demotivate करायला चांगले जमते , अश्या लोकांसोबत कामं करायला कोणाला आवडतं नाही .कौतुकाशिवाय कर्मचारी निरुत्साही होऊ शकतात आणि त्यांच्या नोकरीतील रस कमी होण्याची शक्यता असते . पांढऱ्या कागदावरचा काळा ठिपका पहावा,की बाकी पहावे ? काही लोकं असेचं असतात त्यांना पुढच्याने कितीही कामासाठी मेहनत केली ती दिसतं नाही. कायम ते चुका काढण्यांत धन्यता मानतात . मग अश्या वेळेस कर्मचारी टिकतं नाही,कायम नवीन नवीन कर्मचारी घ्यावे लागतात ,कामाचं सगळं गणितं बिघडतं. आमच्या टीमसाठी /कंपनीसाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात ,कसे सांगाल ?

> कौतुकासाठी योग्य वेळ आली की नक्की सांगा ,जसे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यावर.

> जसं जमेल तसं व्यक्त व्हा,सर्वांसमोर कौतुक करा.

> Fantastic job ! याचं खरंच मनापासून कौतुक हे नक्की सांगा .

> तुमची मेहनत मला सतत प्रेरणा देते हे सांगताना ते पुढच्या पर्यंत पोहचू देतं.

> त्यांच्या कार्याबद्दल ,योगदानाबद्दल आभार व्यक्त करा.

> त्यांच्या योगदानाच्या परिणामांची दखल घ्या.

> त्यांच्या सोशिकपणा ,चिकाटी ,सहयोग यासाठी आभार व्यक्त करा.

> कामाचा दबावाखाली देखील शांत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणा.

पुढे देखील तुम्ही संघाचा /कंपनीचा भाग असाल आणि भविष्यात तुमच्यासोबत काम करण्यास सर्व उत्सुक आहेत हे जेव्हा संघ सदस्य /कर्मचारी जाणतो तेव्हा त्याचासाठी हे कुढल्या reward पेक्षा नक्कीचं मोठं असतं. आपलेपणाची भावना, कामाचे कौतुक हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे असते शेवटी आपण माणसे आहोत मशीन नाही. कंपनीची वाढ आणि उत्पादकता ठरवणारा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्मचार्‍यांच्या कामाची पावती ,संघाच्या कठोर परिश्रमाची दखल ! कर्मचार्‍यांचे कौतुक हे चांगल्या कंपनी संस्कृतीची ओळख ठरते. जे चांगले आणि प्रशंसनीय आहे ते ओळखा ,त्याची पोचपावती द्या ,कृतज्ञता दाखवा .कौतुक हे सर्वांसाठी असतं टीम लीडरने संघासाठी, बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ,सह- कर्मचाऱ्यांनी एकमेकांसाठी !तेव्हा, पुढच्यावेळेस कोणी छान कामं केले तर कौतुकाची थाप नक्की द्या आणि सांगा Well Done ! Great Going!!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in