E-Bike : ई-बाईक खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?

वॉरंटीसाठी बाईकच्या निर्मात्याकडे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाची नोंदणी करायला विसरू नका. ई-बाईकमध्ये बॅटरीचे महत्त्व महत्त्वाचे असल्याने...
E-Bike : ई-बाईक खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?

भारतात पेट्रोलच्या महागाईने सर्वजण हैराण झाले आहेत. अशामध्ये आता पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बाईक (E-bike) चा शोध लावण्यात आला, आणि त्या बघता बघता वापरात हि आल्या...  या बाईक बॅटरीच्या साहाय्याने चालते. यात नवनवीन रंग, नवनवीन डिझाईन उपलब्ध आहेत. यामध्ये काही मोठ्या नावाजलेल्या कंपन्यादेखील आहेत जसे की, बजाज, रिव्होल्ट, अथर, ओला इलेक्ट्रिक, हिरो इलेक्ट्रिक, इत्यादी... याव्यतिरिक्त अन्य कंपन्यादेखील यामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. 

ई-बाईक घ्यायची असल्यास अभ्यास करून घेणे 

ई-बाईक खरेदी करताना बॅटरीचा अभ्यास करून घ्यावा. जवळजवळ सर्व बाईकमध्ये लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. ज्या पाच वर्षापेक्षा जास्त काळ टिकतात. तसेच बॅटरी वॉरंटीची माहिती ही घ्यावी.

ई -बाईकचे फायदे ?

हि बाईक बॅटरीवर चालते, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या खर्चापासून सुटका मिळते. ई -बाईकमध्ये एका चार्जला ३ ते ४ युनिट वीज लागते. एका युनिटमध्ये ९ रुपये मानले तरी ३६ रुपये लागतात. तसेच ही शंभर किलोमीटर मायलेज देते.ई -बाईकमध्ये ऊर्जेचा स्रोत असतो, त्यामुळे आपण वीज ही साठवून ठेवू शकतो. त्याचप्रमाणे असे म्हणतात ई-बाईक पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, यातून प्रदूषण होत नाही.

ई-बाईक हि बॅटरीच्या साहाय्याने चालते, तिला चार्जिंग करण्यासाठी ४-७ तास लागतात. तसेच चार्जिंगच्या वेळी बॅटरीला आग लागण्याच्याही खूप घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ती धोकादायक ही ठरू शकते. सामान्य बाईकपेक्षा ई-बाईकची खरेदी आणि देखरेख करण्यासाठी ही अधिक खर्च येतो. तसेच इलेक्ट्रिक बाईकचा वेग जास्त असल्याने थांबणे किंवा वळणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यूदेखील होऊ शकतात.

त्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्या -

तुम्ही वाहन चालवण्याआधी नेहमी वापरकर्ता मॅन्युअल वाचण्याची खात्री करा आणि त्यानुसार सूचना आणि खबरदारी घ्या.

वॉरंटीसाठी बाईकच्या निर्मात्याकडे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाची नोंदणी करायला विसरू नका. ई-बाईकमध्ये बॅटरीचे महत्त्व महत्त्वाचे असल्याने, निर्मात्याला आवश्यक असेल तेव्हा त्या बदलण्यासाठी तुम्ही तुमच्या निर्मात्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

वाहन चार्ज करताना, वाहन खरेदी करताना उत्पादकाने दिलेल्या वायर आणि अडॅप्टरचाच वापर करा.

पॉवर एक्स्टेंशन वापरू नका, उलट थेट स्विचवरून बाइक चार्ज करा.

शक्य असल्यास, तुम्ही ज्या ठिकाणी ई-बाईक चार्ज करता त्या ठिकाणी स्मोक डिटेक्टर लावा.

तुमच्या ई-बाईकची बॅटरी पावसात भिजणे टाळा कारण त्यामुळे बॅटरी पूर्णपणे खराब होईल, तुमच्या निर्मात्याकडे ते तपासा.

जुन्या लिथियम-आयन बॅटरी घरी ठेवण्याचे टाळा, त्याऐवजी लगेच रिसायकल करा.

तुमची ई-बाईक रात्रभर चार्ज करू नका. तसेच, चार्ज होत असताना तुमच्या ई-बाईककडे लक्ष न देता सोडू नका.

सार्वजनिक ठिकाणी तुमची ई-बाईक चार्ज करताना, चार्जिंगसाठी फक्त सरकारी मान्यताप्राप्त स्टेशन वापरा.

तुमची ई-बाईक थेट सूर्यप्रकाशाखाली पार्क करणे टाळा. सावलीत पार्क करा.

तुमचे चार्जिंग क्षेत्र कोणत्याही ज्वलनशील गोष्टींजवळ सेट करू नका.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in