ओह नो... व्हॉट्सअॅप पडले बंद... कधी सुरु होणार ?

अनेक युजर्सने यावर नाराजी व्यक्त करत याबद्दल ट्विट करायला सुरुवात केली
ओह नो... व्हॉट्सअॅप पडले बंद... कधी सुरु होणार ?

जगभरात लाखो वापरकर्ते असलेले व्हॉट्सअॅप भारतामध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काही अंशी बंद झाले. त्यामुळे अनेक युजर्सने यावर नाराजी व्यक्त करत याबद्दल ट्विट करायला सुरुवात केली आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाउन झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये यूजर्स व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठवू शकत नसून केवळ पर्सनल चॅटची सुविधा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे ही त्रुटी नेमकी कधी दूर होणार? याबाबत नेटकऱ्यांनी ट्विटरवर विचारणा सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in