भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ द्यायचे तरी कुठे? नगरसेवकांअभावी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न रखडला

भटक्या कुत्र्यांना ही जगण्याचा अधिकार असून त्यांना त्रास देणे योग्य नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले
भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ द्यायचे तरी कुठे? नगरसेवकांअभावी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न रखडला

भटक्या कुत्र्यांना आता मुंबई महापालिकेने निश्चित केलेल्या जागेवरच खाद्यपदार्थ देणे बंधनकारक करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्राणी प्रेमींनी पालिकेच्या या या निर्णयाला विरोध केला आहे. नगरसेवक पद अस्तित्वात असते तर त्यांनी आपल्या प्रभागातील प्राणी प्रेमी व लोकांची समजूत काढत यावर तोडगा काढला असता. मात्र नगरसेवक पद अस्तित्वात नसल्याने भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ कुठे द्यायचे हा जागा निश्चितीचा प्रश्न रखडला आहे.

भटक्या कुत्र्यांना ही जगण्याचा अधिकार असून त्यांना त्रास देणे योग्य नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्यासाठी जागा निश्चित करा, अशा सूचना ही केल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ कुठे टाकावेत यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांना विशेष सोसायटी परिसरात असलेल्या रस्त्यांवर खाद्यपदार्थ टाकले जातात. यामुळे भटके कुत्रे त्याच ठिकाणी राहतात आणि रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्या व दुचाकीस्वारांना विशेष करून रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन जावे लागते. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कुत्र्यांचे निबिर्जिकरण करण्यात येते. आता रस्त्यांवरील कुत्र्यांना कुठेही खाद्यपदार्थ टाकण्यात येऊ नये यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ घालण्यासाठी एखादी जागा निश्चित करण्यात येत आहे. पालिकेने निश्चित करुन दिलेल्या जागेवर भटक्या कुत्र्यांना दिलेल्या वेळेतच खाद्यपदार्थ द्यावे, असे आवाहन प्राणी प्रेमींना करण्यात आले.

मात्र पालिकेच्या आव्हानाला प्राणी प्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ कुठे टाकावे जागा निश्चितीचा प्रश्न तूर्तास रखडला आहे. मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक असून २२७ प्रभागात नगरसेवक काम करत असतात. त्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिकांशी त्यांचा थेट संवाद असतो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ कुठे टाकावेत यावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र ७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि सध्या मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांनंतर त्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल, जेणे करून नगरसेवक आपल्या प्रभागातील नागरिक व प्राणी प्रेमींची समजून काढतील आणि भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ टाकण्याची जागा निश्चित होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in