'यूथ इक्वाइन लीडरशिप’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता ‘भविष्य यान’

एक चांगला नेता हा लोकांचे नेतृत्व करताना, त्यांची सेवा करण्यासाठी संधी शोधतो. नेतृत्वाची कल्पना नेहमीच सत्तेच्या स्थितीशी जोडलेली नसते
'यूथ इक्वाइन लीडरशिप’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता ‘भविष्य यान’

द फ्री प्रेस जर्नल समूहाने ‘यूथ इक्वाइन लीडरशिप’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता ‘भविष्य यान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लेखक आणि अध्यात्मिक गुरू शुभ विलास प्रभू यांनी भारतीय धर्मग्रंथातून प्रेरणा घेऊन नेतृत्वाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. “एक चांगला नेता हा लोकांचे नेतृत्व करताना, त्यांची सेवा करण्यासाठी संधी शोधतो. नेतृत्वाची कल्पना नेहमीच सत्तेच्या स्थितीशी जोडलेली नसते. नेतृत्व ही एक जबाबदारी असून तुम्ही त्याठिकाणी नैतिकतेने सेवा करता,” असे उद्गार शुभ विलास प्रभू यांनी काढले.

प्रभूजींनी तीन प्रकारच्या नेत्यांचे स्पष्टीकरण देताना महाभारतातील उदाहरणे देऊन सत्र अधिक आकर्षक केले. “पहिल्या प्रकारचा नेता लोकांच्या उणीवा आणि चुकांबद्दल आंधळा असतो, ज्यांना तो अनुकूल असतो. महाभारतातील धृतराष्ट्राप्रमाणे तो केवळ स्वत: आंधळाच नव्हता तर तो आपल्या मुलांच्या चुकांबद्दलही आंधळा होता. दुसऱ्या प्रकारचा नेता भीष्मासारखा असून तो खूप शक्तिशाली आहे आणि भविष्यात समस्या निर्माण करणारी तत्त्व, धोरणे बनवतो. तिसऱ्या प्रकारचा नेता म्हणजे विदुरासारखा. ज्याला समस्या काय आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती असूनही दुर्दैवाने त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य त्यात नाही. अनेक संस्थांमध्ये सहसा असे नेते असतात. तथापि, दीर्घकाळ टिकणाऱ्या नेतृत्वाकडे संतुलित आणि शाश्वत दृष्टिकोनाची गरज आहे,” असेही प्रभूजींनी स्पष्ट केले.

“नेतृत्वाशिवाय भारतीय धर्मग्रंथांमधून अनेक धडे शिकता येतात. उदाहरणार्थ, आपल्या जीवनातील इतर पैलूंबरोबरच यश, अपयश, नातेसंबंध, निर्णय घेणे याबाबत अनेक गोष्टी शिकता येतात,” असेही प्रभूजींनी स्पष्ट केले. सत्राअखेरीस मंजिरी शिरोडकर म्हणाल्या, “हे सत्र अत्यंत अभ्यासपूर्ण होते. यामुळे मला नेतृत्व चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत झाली. एखाद्या नेत्याने आपल्या जनतेला प्रेरणा देऊन आणि प्रेरित करून त्यांचे नेतृत्व केले पाहिजे. त्याने त्यांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.” ज्ञानवर्धक सत्रानंतर मनोरंजनपर प्रश्नोत्तरांच्या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रभूजींनी ‘टाइमलेस टेल्स टू इग्नाइट युवर माइंड : ५० स्टोरीज ऑफ विट अँड विजडम फ्रॉम ॲन्शन्ट इंडिया’ या पुस्तकावर स्वाक्षरी केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ जाहिरातकार रमेश नारायणदेखील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in