हार्ट पेशंट आहात? हिवाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या 'या' 10 पौष्टिक गोष्टी नक्की खा!

हिवाळ्याच्या हंगामात या 10 गोष्टींचे नियमित सेवन केल्याने शरीराला मॅग्नेशियमचा पुरेसा पुरवठा होतो..
हार्ट पेशंट आहात? हिवाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या 'या' 10 पौष्टिक गोष्टी नक्की खा!
Published on
1. बदाम-
बदाम हे मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहे. हिवाळ्यात बदाम खाल्ल्याने  शरीरात मॅग्नेशियम वाढण्यास मदत होते आणि हृदयाशी निगडीत आजार बरे होतात, हाडांची ताकद आणि जुनाट आजारांचा धोका कमी करणे यासारखे अनेक  फायदे  हीमिळू शकतात.
1. बदाम- बदाम हे मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहे. हिवाळ्यात बदाम खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियम वाढण्यास मदत होते आणि हृदयाशी निगडीत आजार बरे होतात, हाडांची ताकद आणि जुनाट आजारांचा धोका कमी करणे यासारखे अनेक फायदे हीमिळू शकतात.
2. पालक-
पालकामध्ये मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. हिवाळ्यात पालक खाल्ल्याने मॅग्नेशियमची पातळी वाढण्यास आणि शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते, पचनक्रीया सुधारते, रोगप्रतिकार शक्तीची वाढ होते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
2. पालक- पालकामध्ये मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. हिवाळ्यात पालक खाल्ल्याने मॅग्नेशियमची पातळी वाढण्यास आणि शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते, पचनक्रीया सुधारते, रोगप्रतिकार शक्तीची वाढ होते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
3. भोपळा बिया-
भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमने भरलेल्या असतात आणि हिवाळ्यात तुम्ही मॅग्नेशियमने भरपुर असलेल्या गोष्टींचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहते. भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमचे सेवन वाढविण्यात मदत करू शकतात आणि यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते, जळजळ कमी करणे यासारखे अतिरिक्त फायदे होतात.
3. भोपळा बिया- भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमने भरलेल्या असतात आणि हिवाळ्यात तुम्ही मॅग्नेशियमने भरपुर असलेल्या गोष्टींचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहते. भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमचे सेवन वाढविण्यात मदत करू शकतात आणि यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते, जळजळ कमी करणे यासारखे अतिरिक्त फायदे होतात.
4. डार्क चॉकलेट-
डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यात डार्क चॉकलेटचे तुकडे खाल्ल्याने शरीरातली मॅग्नेशियम पातळी वाढण्यास मदत होऊ शकते आणि डार्क चॉकलेटमुळे मूडही सुधारतो, आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
4. डार्क चॉकलेट- डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यात डार्क चॉकलेटचे तुकडे खाल्ल्याने शरीरातली मॅग्नेशियम पातळी वाढण्यास मदत होऊ शकते आणि डार्क चॉकलेटमुळे मूडही सुधारतो, आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
5. क्विनोआ-
क्विनोआ हे मॅग्नेशियमने भरपुर असलेले पौष्टिक धान्य आहे. तुमच्या हिवाळ्यातील आहारामध्ये क्विनोआचा समावेश केल्याने मॅग्नेशियमची पातळी वाढण्यास हातभार लागतो आणि पचनक्रिया ही सुधारते, वाढलेली ऊर्जा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य यासारखे फायदे मिळू शकतात.
5. क्विनोआ- क्विनोआ हे मॅग्नेशियमने भरपुर असलेले पौष्टिक धान्य आहे. तुमच्या हिवाळ्यातील आहारामध्ये क्विनोआचा समावेश केल्याने मॅग्नेशियमची पातळी वाढण्यास हातभार लागतो आणि पचनक्रिया ही सुधारते, वाढलेली ऊर्जा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य यासारखे फायदे मिळू शकतात.
6. काळे सोयाबीन- 
काळे सोयाबीन हे हिवाळ्यात मॅग्नेशियमचे स्त्रोत आहे. काळ्या सोयाबीनचे सेवन केल्याने आतड्याचा त्रास होत नाही, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आणि मेंदूचे कार्य सुधारणे यासारखे इतर फायदे मिळू शकतात.
6. काळे सोयाबीन- काळे सोयाबीन हे हिवाळ्यात मॅग्नेशियमचे स्त्रोत आहे. काळ्या सोयाबीनचे सेवन केल्याने आतड्याचा त्रास होत नाही, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आणि मेंदूचे कार्य सुधारणे यासारखे इतर फायदे मिळू शकतात.
7. एवोकॅडो-
एवोकॅडो हे एक पौष्टिक फळ आहे. हिवाळ्यात एवोकॅडो खाल्ल्यांने त्वचेचे आजार नाहीसे होतात, पोटातली जळजळ कमी होणे आणि शरीराला फायदे मिळू शकतात.
7. एवोकॅडो- एवोकॅडो हे एक पौष्टिक फळ आहे. हिवाळ्यात एवोकॅडो खाल्ल्यांने त्वचेचे आजार नाहीसे होतात, पोटातली जळजळ कमी होणे आणि शरीराला फायदे मिळू शकतात.
8. सॅल्मन-
सॅल्मन केवळ ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा एक उत्तम स्रोत नाही तर त्यात मॅग्नेशियम देखील आहे. हिवाळ्यात सॅल्मन खाल्ल्याने तुमची मॅग्नेशियम पातळी वाढू शकते आणि हृदयाचे आरोग्य सुधारणे, नैराश्याचा धोका कमी करणे आणि मेंदूचे कार्य सुधारणे यासारखे अतिरिक्त फायदे मिळू शकतात.
8. सॅल्मन- सॅल्मन केवळ ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा एक उत्तम स्रोत नाही तर त्यात मॅग्नेशियम देखील आहे. हिवाळ्यात सॅल्मन खाल्ल्याने तुमची मॅग्नेशियम पातळी वाढू शकते आणि हृदयाचे आरोग्य सुधारणे, नैराश्याचा धोका कमी करणे आणि मेंदूचे कार्य सुधारणे यासारखे अतिरिक्त फायदे मिळू शकतात.
9. मसूर-
हिवाळ्यात मसूर खाल्ल्याने सुधारित पचन, वजन व्यवस्थापन आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
9. मसूर- हिवाळ्यात मसूर खाल्ल्याने सुधारित पचन, वजन व्यवस्थापन आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
10. ग्रीक दही-
ग्रीक दही हा मॅग्नेशियम आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. हिवाळ्यात ग्रीक दह्याचा आस्वाद घेतल्याने मॅग्नेशियमची पातळी वाढण्यास मदत होते आणि हाडांचे आरोग्य सुधारणे, स्नायूंचे सुधारणे आणि आतड्यांचा त्रास होत नाही, आरोग्य चांगले राहते. यासारखे फायदे मिळू शकतात.
10. ग्रीक दही- ग्रीक दही हा मॅग्नेशियम आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. हिवाळ्यात ग्रीक दह्याचा आस्वाद घेतल्याने मॅग्नेशियमची पातळी वाढण्यास मदत होते आणि हाडांचे आरोग्य सुधारणे, स्नायूंचे सुधारणे आणि आतड्यांचा त्रास होत नाही, आरोग्य चांगले राहते. यासारखे फायदे मिळू शकतात.

हे पदार्थ हिवाळ्यात शरीरातील मॅग्नेशियम आणि पोषक घटक वाढवण्याचे काम करतात. हिवाळ्याच्या हंगामात या 10 गोष्टींचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मॅग्नेशियमचा पुरेसा पुरवठा होतो..

logo
marathi.freepressjournal.in