पन्हाळा - पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासून 20 कि.मी. अंतरावर आहे. समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे. जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्या रंगाचा वारसा येथे जपला आहे. हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.
हा किल्ला रक्षण करणार्या 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.
शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे, सिद्धी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री या वेढ्यातून सुटून शिवाजी महाराज विशाळगडला गेले. सिद्धी जोहारने त्यांचा पाठलाग केला. तेंव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड येथे त्याला अडवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचू शकले, परंतु बाजीप्रभू देशपांडे येथे धारातिर्थ पडले व मरण पावले.X - @tushar_speaks