१.५ लाख मुंबईकरांना पुष्पोत्सवाची भुरळ; फुलांनी सजविलेली राष्ट्रीय प्रतीके ठरली मुख्य आकर्षण

१.५ लाख मुंबईकरांना पुष्पोत्सवाची भुरळ; फुलांनी सजविलेली राष्ट्रीय प्रतीके ठरली मुख्य आकर्षण
छायाचित्र सौ : @AshwiniBhide
Published on
विविधरंगी फुलांनी सजविलेली राष्ट्रीय प्रतीके, बोधचिन्ह तसेच फळे व फुलं भाज्यांची रेलचेल यासह बगीच्यासाठी लागणारी खते-अवजारे आदींच्या खरेदीसाठी जमलेले मुंबईकर आणि आकर्षक फुलांना पाहण्यासाठी-अनुभवण्यासाठी आलेली लहान मुले, अशा वातावरणात मुंबई पुष्पोत्सवाचा रविवारी समारोप झाला.
विविधरंगी फुलांनी सजविलेली राष्ट्रीय प्रतीके, बोधचिन्ह तसेच फळे व फुलं भाज्यांची रेलचेल यासह बगीच्यासाठी लागणारी खते-अवजारे आदींच्या खरेदीसाठी जमलेले मुंबईकर आणि आकर्षक फुलांना पाहण्यासाठी-अनुभवण्यासाठी आलेली लहान मुले, अशा वातावरणात मुंबई पुष्पोत्सवाचा रविवारी समारोप झाला. छायाचित्र सौ : @AshwiniBhide
तब्बल दीड लाख मुंबईकरांनी या पुष्पोत्सवाला अर्थातच वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला भेट दिली.
तब्बल दीड लाख मुंबईकरांनी या पुष्पोत्सवाला अर्थातच वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला भेट दिली.छायाचित्र सौ : @AshwiniBhide
यावर्षीच्या पुष्पोत्सवात पाच हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला.
यावर्षीच्या पुष्पोत्सवात पाच हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला.छायाचित्र सौ : @AmrutaManePR
मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले होते.छायाचित्र सौ : @MYCOCOMPOST
यंदाच्या पुष्पोत्सवासाठी ‘राष्ट्रीय प्रतीके’ ही संकल्पना घेऊन उद्यान विभागाने रुपया, तिरंगा ध्वज, गंगानदी, गंगा डॉल्फिन, आंबा, मोर, जिलेबी आदींच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या. फळांच्या विविध प्रजातींची रोपटे, विविध फुलझाडे, वनस्पती औषधी आदींचा त्यात समावेश होता.
यंदाच्या पुष्पोत्सवासाठी ‘राष्ट्रीय प्रतीके’ ही संकल्पना घेऊन उद्यान विभागाने रुपया, तिरंगा ध्वज, गंगानदी, गंगा डॉल्फिन, आंबा, मोर, जिलेबी आदींच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या. फळांच्या विविध प्रजातींची रोपटे, विविध फुलझाडे, वनस्पती औषधी आदींचा त्यात समावेश होता. छायाचित्र सौ : @MikkhailVaswani
तीन दिवसांत मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे अभ्यासक आदींनी देखील भेट दिली.
तीन दिवसांत मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे अभ्यासक आदींनी देखील भेट दिली.छायाचित्र सौ : @MYCOCOMPOST
प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तूंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने या ठिकाणीही पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तूंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने या ठिकाणीही पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. छायाचित्र सौ : @AmrutaManePR
अभिनेता जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन, अभिनेता अरुण कदम, अभिनेत्री नेहा जोशी यांच्यासह विविध सिनेकलाकार, प्रतिष्ठित व नामवंत नागरिक यांनीदेखील पुष्पोत्सवाला भेट दिली.
अभिनेता जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन, अभिनेता अरुण कदम, अभिनेत्री नेहा जोशी यांच्यासह विविध सिनेकलाकार, प्रतिष्ठित व नामवंत नागरिक यांनीदेखील पुष्पोत्सवाला भेट दिली. छायाचित्र सौ : @MYCOCOMPOST
प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तूंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने या ठिकाणीही पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होती
प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तूंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने या ठिकाणीही पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होतीछायाचित्र सौ : @AshwiniBhide
तीन दिवस चाललेल्या या 'मुंबई पुष्पोत्सवा'स मुंबईकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.
तीन दिवस चाललेल्या या 'मुंबई पुष्पोत्सवा'स मुंबईकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत. छायाचित्र सौ : @richapintoi
logo
marathi.freepressjournal.in