Monsoon Tips : पावसाळ्यात ही ५ फळं आरोग्यासाठी फायदेशीर, इंफेक्शनसह डायजेशनची समस्याही होते दूर

पावसाळ्यात इंफेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो त्यामुळे अनेकजण आजारी पडतात. तेव्हा या ऋतूमध्ये अशी काही फळ आहेत जी तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतात. अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असणारी काही फळं आजारांपासून बचावासाठी उपयोगी ठरतात. तेव्हा अशा फळांबद्दल जाणून घेऊयात.
fruits
पावसाळ्यात ही ५ फळं आरोग्यासाठी फायदेशीरcanva
Published on
papaya
पपई : पपई ही प्रत्येक ऋतूमध्ये बाजारात उपलब्ध असते तसेच प्रत्येक ऋतूमध्ये याचे सेवन आरोग्यदायी समजले जाते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते तसेच यात असलेले व्हिटॅमिन सी आणि ए त्वचेसाठी चांगलं ठरतं. canva
Apple
सफरचंद : पावसाळ्यात सफरचंद खाणं फायदेशीर मानलं जातं. सफरचंदमध्ये भरपूर फायबर आढळते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच यात आढळणारे अँटी ऑक्सिडंट्स इंफेक्शन पासून बचाव करतात. canva
Pear
नाशपती : नाशपती या फळात फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. नाशपती शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते तसेच हे फळ अँटी ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानला जातो. नाशपतीच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. Canva
Jamun
जांभूळ : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात जांभळाची आवक होत असते. जांभळामध्ये अँटी ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन सी, फायबर इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच पचनक्रिया चांगली राहण्यासाठी जांभळाचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच जांभूळ हे फळ डायबेटिज नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. Canva
mango
आंबा : पावसाळ्यात फळांचा राजा समजला जाणारा आंब्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. आंब्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळतात. हे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात फायदेशीर ठरतात. आंबा हा त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर समजला जातो. पावसाळ्यात आंबा खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. canva
logo
marathi.freepressjournal.in