शेख हसीनांच्या घरात घुसून आंदोलनकर्त्यांची लुटपाट; साडी-ब्लाउज, खुर्ची, पंखा, बकरी काहीच नाही सोडलं!
Bangladesh Protest: आरक्षणाबाबत बांगलादेशात झालेल्या गदारोळानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर झाली आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला करत तिकडच्या अनेक गोष्टी लुटल्या आहेत.
वाढत्या हिंसक निदर्शनांदरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे. तिकडे परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. हिंसाचार इतका भडकला आहे की, आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावरच हल्ला केला. Photo Credit: X
पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी लुट केली आहे. याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहे. Photo Credit: X
आंदोलकांनी तिथून खुर्च्या, टेबल, सोफा, कुराण, दिवे, महागडे पंखे, फर्निचर, प्लांट, आरओ प्युरिफायर, टीव्ही, ट्रॉली बॅग, एसी, गाद्या असा मोठा वस्तू लुटून नेल्या.Photo Credit: X
फक्त घरातल्याच गोष्टी नाही तर हसीना यांचे कपडे आणि वैयक्तिक वस्तू घेऊन जाताना आंदोलक दिसत आहेत. Photo Credit: X
याशिवाय कोणी बागेतील बदक तर कोणी शेळी लुटली. हे सर्व करत असताना लोक अभिमानाने स्वत:चे फोटो काढत आहेत.
काही लोक हसीना यांच्या बेडरूमची लूट करत आहेत. त्यांनी बेडवरच्या गाडीचीही लूट केल्याचे दिसून येत आहे. Photo Credit: X
एक व्यक्ती कॉर्डलेस फोन घेऊन पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडली. Photo Credit: X
एक व्यक्ती हातात अंतर्वस्त्र घेऊन जाताना दिसला. Photo Credit: X
टीव्ही ते अंतर्वस्त्र आंदोलकांनी काहीच ठेवलं नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून दिसत आहे. Photo Credit: X
काही आंदोलक शेख हसीनाच्या पलंगावर आराम करताना दिसत आहे. त्यांच्या बेडवर झोपून फोन बघत झोपलेले आहेत.
Photo Credit: X
हसीना यांच्या घरातील लुटीनंतर आंदोलकांनी अवामी लीगच्या अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या घरांवर, कार्यालयांवरही हल्ले केले. Photo Credit: X
गेल्या अनेक दिवसांपासून देशात हिंसाचार सुरू होता, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण सोमवारी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाले, त्यानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला. Photo Credit: X