वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. वाढलेले वजन झटपट कमी करायचे असेल तर या १० भाज्या उकडून खा. यामुळे झटपट वजन कमी होते. तसेच आरोग्यही चांगले राहते.
पालक - हिरव्या भाज्या उकळून खाल्ल्याने त्याचे आरोग्याला जास्त फायदे होतात. विशेष करून पालकची भाजी उकळून खाल्ल्याने त्यातील पौष्टिक घटक वजन कमी करण्यास मदत करतात तसेच आरोग्यही चांगले ठेवतात. पालकची भाजी ही अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळेच याला Superfood, असेही म्हणतात.
Freepik
कोबी ही पचायला हलकी भाजी आहे. तसेच ते उकळून खाल्ल्याने त्याची पोष्टिकता वाढते. हे वजन कमी करण्यासाठी मदत करते.
फ्लॉवर हे उकळून खाणे आरोग्याला फायदेशीर असते. यामुळे यामधील शरिराला पचण्यासाठी जड असलेले घटक हलके होतात. त्यामुळे फ्लॉवर उकळून खाल्ल्याने लवकर पचते. परिणामी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत मिळते.
बीन्स
बीन्स अनेक प्रकारचे असतात. यामध्ये सोयाबीन, चवळी इत्यादींचा समावेश होतो. बीन्स उकळून खाल्ल्याने तर फायदा होतोच मात्र, त्याच्या शेंगा उकळून खाणे जास्त चांगले असते. यामध्ये जास्त पौष्टिक तत्व असतात.
स्वीट कॉर्न - अनेक वेळा बाजारात किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तिथे स्वीट कॉर्न भेळ हमखास खायला मिळते. स्वीट कॉर्न हे खूप चविष्ट असतात. यात असणारे फायबर्स बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.
रताळ्यांमध्ये फायबर आणि कार्ब मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच मधुमेह रुग्णांसाठी देखील रताळे हे चांगले अन्न आहे. अनेक जण रताळे कच्चे खातात. मात्र, रताळे उकळून खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरते.
गाजर हे फळवर्गीय भाज्यांमध्ये मोडते. गाजराचे छोटे तुकडे करून उकळून मीठ आणि काळीमिरीसह पाण्यात उकळून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. गाजर हे सॅलडमध्ये कच्चे देखील खाल्ले जाते. गाजर कच्चे आणि उकळलेले, असे दोन्ही प्रकारे खाणे फायदेशीर असते. दोन्हींचे फायदे वेगवेगळे असतात.
बीट- डाएटमध्ये लोक सॅलडचा समावेश असतो. सॅलडमध्ये बीट प्रामुख्याने असते. गाजराप्रमाणेच बीट देखील कच्चे आणि उकळून खाणे, अशा दोन्ही प्रकारे आरोग्याला फायदेशीर ठरते. बीट तीन मिनिटांपेक्षा अधिक उकळू नये. महिलांना रक्ताची कमतरता किंवा मासिक पाळीतील समस्यांमध्ये बीट उकळून खाणे अधिक चांगले असते.
बटाटे - बटाटे उकळून खाल्ल्याने त्याच्या गुणधर्मात बदल होतो. मात्र, हे अतिप्रमाणात खाऊ नये. कारण यामध्ये स्टार्च जास्त असते.
ब्रोकोली ही भाजी फ्लॉवरप्रमाणे आहे. ही भाजी उकळून खाल्ल्याने यातील जड घटक हलके होतात. तसेच याची पौष्टिकता वाढते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)