Deepika padukone B'day : 'ओम शांति ओम' नव्हता दीपिकाचा पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन!

Deepika padukone B'day : 'ओम शांति ओम' नव्हता दीपिकाचा पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन!
Published on
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
दीपिका ही लहानपणी लेव्हीच्या जीन्सची जोडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असायची. पण आज तिने असे स्थान निर्माण केले आहे की ,ती या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. तिच्या 16 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत तिने 39 चित्रपट केले आणि 52 मोठे पुरस्कार जिंकले.
दीपिका ही लहानपणी लेव्हीच्या जीन्सची जोडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असायची. पण आज तिने असे स्थान निर्माण केले आहे की ,ती या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. तिच्या 16 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत तिने 39 चित्रपट केले आणि 52 मोठे पुरस्कार जिंकले.PM
 मॉडेलिंगनंतर दीपिकाने फिल्मी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. फराह खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून दीपिकाला खूप प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट 9 नोव्हेंबर 2007 रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्यात दीपिकाने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाला दीपिकाचा डेब्यू चित्रपट म्हणतात.
मॉडेलिंगनंतर दीपिकाने फिल्मी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. फराह खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून दीपिकाला खूप प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट 9 नोव्हेंबर 2007 रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्यात दीपिकाने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाला दीपिकाचा डेब्यू चित्रपट म्हणतात.PM
दीपिकाला भलेही 'ओम शांती ओम' मधून खूप प्रसिद्धी मिळाली असेल पण तिने अभिनयाची सुरुवात दक्षिणेतून केली. दीपिका पदुकोणने 2006 मध्ये 'ऐश्वर्या' या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती साऊथ अभिनेता उपेंद्रसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव 'ऐश्वर्या पै' असे होते. या चित्रपटात दीपिकाला पसंती मिळाली पण तिला तितकीशी प्रसिद्धी मिळू शकली नाही.
दीपिकाला भलेही 'ओम शांती ओम' मधून खूप प्रसिद्धी मिळाली असेल पण तिने अभिनयाची सुरुवात दक्षिणेतून केली. दीपिका पदुकोणने 2006 मध्ये 'ऐश्वर्या' या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती साऊथ अभिनेता उपेंद्रसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव 'ऐश्वर्या पै' असे होते. या चित्रपटात दीपिकाला पसंती मिळाली पण तिला तितकीशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. PM
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, दीपिकाने 2018 मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले. अलीकडेच दीपिकाने तिच्या एका मुलाखतीत आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, दीपिकाने 2018 मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले. अलीकडेच दीपिकाने तिच्या एका मुलाखतीत आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.PM
logo
marathi.freepressjournal.in