
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. यामुळे मानसिक ताण देखील होत असतो. मानसिक ताणतणाव कमी करायचा असेल तर रोज थोडा वेळ स्वत:वर लक्ष द्यायला हवे. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासन, प्राणायाम आणि ध्यान करणे उत्तम पर्याय आहे. यासाठी एकदा जाणून घेऊयात कोणते आसन केल्यानंतर ताण कमी होईल आणि आपला रोजचा दिवस आनंदी जाईल.
प्राणायाम
प्राणायाम, किंवा श्वासाची नियंत्रित साधना, मानसिक शांती आणि तणाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करून श्वास घेतला जातो, ज्यामुळे मन शांत होते. नियमित प्राणायाम केल्याने आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे स्फुर्ती मिळते. नियमित प्राणायाम केल्याने चिंता, नैराश्य, आणि तणावाची पातळी कमी होते. यामुळे एकाग्रता सुधारते.
ध्यान
ध्यान हे मनाला शांत ठेवण्याचे सर्वोत्तम साधन आहे. नियमित ध्यान केल्याने मनातील विचारांवर नियंत्रण मिळवता येते. यामुळे मन शांत आणि केंद्रित राहते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. ध्यानामुळे तणाव आणि चिंतेचा स्तर कमी होतो, तसेच आत्मविश्वास वाढतो. साधारणपणे ध्यानाच्या प्रक्रियेत १० ते २० मिनिटे रोज शांत ठिकाणी बसून, मनावर लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे मानसिक थकवा कमी जाणवतो.
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार हे योगाचा एक अत्यंत प्रभावी आसन आहे, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. सूर्यनमस्काराच्या प्रत्येक आसनाने शरीर आणि मन दोन्हीला ताजेतवाने राहते. यामुळे मानसिक ताण कमी होतो. हे आसन शरीरातील ऊर्जा पातळी वाढवते व शरीर आणि मन यामध्ये संतुलन राखते. सूर्यनमस्कार रोज केल्याने मानसिक स्थिती स्थिर राहते.
बालासन
बालासन हे एक अत्यंत आरामदायक आणि शांतता देणारे आसन आहे, जे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले आहे. बालासन करताना, शरीर संपूर्णपणे रिलॅक्स होते आणि मन शांत होते. या आसनाने शरीरातील ताण कमी होतो आणि मानसिक थकवा दूर होतो. नियमित बालासन केल्याने पाठीचे ताणही कमी होतात आणि शरीराची लवचिकता वाढते. यामुळे चिंता आणि नैराश्य कमी होते.
वृक्षासन
वृक्षासन हे शरीरात योग्य संतुलन साधणारे आसन आहे, जे मानसिक स्थिरता आणि शांती साधण्यासाठी उपयुक्त आहे. या आसनात आपले मन आणि शरीर स्थिर होतात, वृक्षासन केल्याने शरीराची एकाग्रता वाढते, आणि ध्यान केंद्रित करण्यास मदत होते. यामुळे आत्मविश्वासही वाढतो. नियमित वृक्षासन केल्याने मानसिक शांती आणि समग्र आरोग्य सुधरते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)