रोज ताक प्या आणि राहा ताजेतवाने; 'हे' आहेत ताक पिण्याचे फायदे
उष्णतेच्या दिवसात आपण सोडा किंवा अन्य थंड पेये पित असतो, परंतु तुुम्हाला माहितीये का ताक किंवा बटर मिल्क अथवा छास आपल्या शरीरासाठी किती आरोग्यदायक आणि फायदेशीर आहे? ताक (ButterMilk) एक उत्कृष्ट आणि चवदार पेय आहे, उन्हाळ्यात उष्णता वाढत असताना आपल्याला ताजेतवाने आणि हायड्रेट राहण्यासाठी काहीतरी पेय हवे असते. त्यासाठी ताक एक उत्कृष्ट पर्याय आहे. ताकाचे आपल्या शरीराला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊयात.
पौष्टिक आणि चवदार पेय
ताक केवळ चवदारच नाही, तर पोषणाने भरलेले आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि पोटॅशियम यांसारख्य विविध व्हिटॅमिन्स आणि खनिनांचे चांगले घटक असतात व अत्यंत चवदार पेय असल्याने आपण उन्हाळ्यात पिऊ शकतो.
पचनास मदत करते
ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे फायदेशीर आहेत, प्रोबायोटिक्स पचन, गॅस, आणि पचनासंबंधी समस्यांमध्ये मदत करतात ज्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य मजबूत होते. पचन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ताक पिणे योग्य आहे तसेच हे एक हलके पेय असुन आपण जेवणानंतर पिऊ शकतो.
ताजेतवाने ठेवते
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेत हायड्रेशन आवश्यक असते, कारण हवामानामुळे आपल्याला डिहायड्रेशन आणि घाम येत असतो, त्यासाठी ताक उत्तम हायड्रेटिंग पेय आहे. ताकामधील पाण्याची मात्रा आणि त्याच्या चवीमुळे भरपूर ताक पिण्याची इच्छा होते.
मजबुत हाडे
आपल्या शरीराला कॅल्शियमची आणि मजबुत व निरोगी हाडांची खूप गरज आहे. त्यासाठी ताक पिणे महत्त्वपूर्ण आहे. ताकामध्ये कॅल्शियम असते, जे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करू शकते. योग्य कॅल्शियमची मात्रा हाडांच्या विकासासाठी आवश्यक आहे. नियमितपणे ताक पिल्याने तुम्हाला दररोज गरज आहे त्या प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होते आणि तुम्हाला ताजेतवाने देखील वाटू लागते.
शरीर थंड ठेवण्यास मदत
ताक शरीराला उष्णतेपासून थंड ठेवण्यास मदत करते, ताक पिण्याने शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते व घाम देखील कमी फुटतो. त्यामुळे तुमच्या उन्हाळ्याच्या पेयांमध्ये ताकाचा समावेश करा, जेणेकरून तुम्ही निरोगी आणि ताजेतवाने राहू शकाल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)


