सिताफळ: हिवाळ्यातील सिताफळ देखील अत्यंत महत्वाचं फळ आहे. अनेकांना यामध्ये खूप बिया असल्यामुळे खायला कंटाळा करतात. पण तुम्ही एकदा या फळाचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला अंदाज येईल की, या फळाचं किती महत्व आहे. सिताफळ हे लहान मुलांसाठी अत्यंत महत्वाच फळ आहे. वजन वाढण्याकरता हे फळ खाल्लं जातं. तसेच लहान मुलांची पचनशक्ती थोडी नाजूक असते अशावेळी सिताफळ खाल्याने पचनशक्ती व्यवस्थीत राहते. यामध्ये व्हिटामीन बी6 चे प्रमाण सर्वाधिक असते. लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तींनी देखील हे फळ खावं.PM