
पिंपल्स ही चेहऱ्यावरील एक सामान्य समस्या आहे, जी मुख्यतः शरीरातील अतिरिक्त तेल, मृत पेशी आणि बॅक्टेरियामुळे होऊ शकते. यासाठी त्वचेला स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी, आपल्याला नियमितपणे चेहरा स्वच्छ धुणे, योग्य स्क्रब वापरणे, आणि तेलयुक्त उत्पादनांचा वापर टाळावा लागतो. या समस्या सोडवण्यासाठी काय उपाय आहेत ते पाहुयात.
दोन चमचे बदाम दूध एक अंड्याचा पांढरा भाग घालून मिसळा. त्यात एक चमचा लिंबाचा रस चांगल्याप्रकारे मिसळा, ज्यामुळे एक क्रीमी मिश्रण तयार होईल. जे पिंपल्स आणि मुरुमांपासून बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर एक संरक्षणात्मक थर तयार करेल. हा फेस मास्क आठवड्यातुन दोन वेळा लावा. अंड्याच्या पांढऱ्या भागाच्या अँस्ट्रिंजंट गुणधर्मामुळे तेलाचे स्राव नियंत्रित होतात आणि मुरुमांच्या खुणांवर उपचार होतो. बदामचे दूध तुम्हाला चांगले, निरोगी आणि मॉइश्चराइज्ड त्वचाप्राप्त करायला मदत करते, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.
१ चमचा ग्रीन टी पानं (किंवा 1 चहा बॅग) 1 कप पाण्यात उकळा त्यानंतर ते थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. ग्रीन टी गाळून एका मोजमाप कपात ओता त्यात १ कप ऍपल सायडर व्हिनेगर घालून तयार झालेले मिश्रण एका काचेच्या बाटलीत ओता. हे ग्रीन टी आणि ऍपल सायडर व्हिनेगरचे टोनर फ्रिजमध्ये ठेवा. दिवसातुन एक किंवा दोन वेळा स्वच्छ आणि कोरड्या त्वचेवर कॉटन पॅडचा वापर करून लावा.
दोन चमचे मध एका भांड्यात घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस चांगल्याप्रकारे मिसळा आणि नंतर ते आपल्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी चेहरा धुवा. हळदमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि ती त्वचेमध्ये होणाऱ्या सूज कमी करते; मध त्वचेला मॉइश्चरायझिंग करते आणि लिंबाचा रस पिंपल्सचे व दुरुस्तीचे डाग हलका करण्यास मदत करतो. हा फेस पॅक आठवड्यात एकदा वापरा, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
कोरफड मध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि थोड्या वेळासाठी ते राहू द्या. हे चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ करेल आणि पिंपल्स होण्याचे कारण ठरणारे बॅक्टेरिया चेहऱ्यावरुन काढून टाकेल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)