आज हृतिक रोशनचा 50 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 10जानेवारी, 1974 रोजी झाला.हृतिकचा नंबर देशातील टॉप स्टार आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये येतो. पण तो 8 वर्षांचा असताना त्यांच्या कुटुंबाला घरमालकाने घराबाहेर हाकलून दिले होते. हृतिकला आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. वडील राकेश रोशन हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध स्टार आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते असतानाही हृतिकला शून्यातून सुरुवात करावी लागली आहे. एक काळ असा होता जेव्हा तो सेटवर लोकांना चहा द्यायचा आणि फरशी झाडून घ्यायचा. PM