'या' चार फळांमधून मिळेल हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक Vitamin C

छायाचित्र सौ. सर्व फोटो Freepik
Published on
आपल्या सर्व शारीरिक हालचालींसाठी हाडांचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.

हाडांचे आरोग्य उत्तम असेल तर चालणे, उठणे, धावणे अशा क्रिया करताना आपल्याला त्रास होत नाही.

हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कॅल्शियमसह पोटॅशियम, मॅग्निशियम,  जीवनसत्त्व ड यासह जीवनसत्त्व क हे देखील अतिशय महत्त्वाचे असते. जीवनसत्त्व क युक्त फळांचे सेवन करून आपण शरिराला याची पूर्तता करू शकतो.

आवळा हे बहुगुणी फळ असून हे जीवनसत्व क ने युक्त असे फळ आहे. आपण आवळ्याचे सेवन अनेक प्रकारे करू शकतो. आवळ्याचे मोरावळा,  कॅन्डी, सुपारी, ज्यूस अशा वेगवेगळ्या पदार्थातून सेवन करू शकतो.

मोसंबी हे क जीवनसत्त्वाचे भंडार आहे. आपण अनेक वेळा पाहतो मोसंबीचे ज्यूस आजारी व्यक्तींना दिल्याने त्यांची तब्येत लगेच सुधारते.

मोसंबी प्रमाणेच संत्री हे फळ देखील जीवनसत्त्व क चे खूप मोठे स्रोत आहे. संत्र्याचा ज्यूस घेतल्याने शरीरात जीवनसत्त्व क ची उणीव भरून निघते.

किवी हे फळ मूळ भारतीय नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे फळ आपल्या भारतीय बाजारांमध्ये सहजरित्या मिळते. तसेच सर्वांच्या परिचयाचे देखील झाले आहे. किवीमध्ये देखील जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याचा देखील आहारात समावेश केल्याने शरीराला क जीवनसत्त्वाची आपुर्ती होते.

logo
marathi.freepressjournal.in